वेलकम स्टाईल की पुतीनला इशारा? डोक्यावरुन गेलं बॉम्बिंग जेट अन्... VIDEO VIRAL

Last Updated:

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन 7 वर्षांनंतर अलास्कामध्ये भेटले. रशिया-युक्रेन युद्धविरामावर तोडगा निघाला नाही. भेटीदरम्यान अमेरिकेच्या B-2 बॉम्बर विमानांनी शक्तीप्रदर्शन केले.

News18
News18
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन तब्बल 7 वर्षांनंतर पहिल्यांदा भेटले. त्यांच्यात जवळपास बंद दाराआड तीन तास चर्चा झाली मात्र त्यातून तोडगा काहीच निघाला नाही. या चर्चेत रशिय युक्रेन युद्धविरामावर कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र या भेटीदरम्यान एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर चर्चा सुरू झाली आहे. तर ट्रम्प यांनी भेट सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे.
व्लादिमीर पुतीन जेव्हा अलास्का इथे पोहोचले तेव्हा त्यांना घेण्यासाठी ट्रम्प आले. दोघेही रेड कारपेटवर चालत असताना अचानक मोठा आवाज झाला. पुतीन यांनी पटकन वर पाहिलं. हवेत बॉम्बिंग विमानं होती. ती काही क्षण हवेत तिथेच होती, त्यानंतर ती मागे फिरली, ट्रम्प यांनी दिलेली रिएक्शन खूप व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे हे नक्की काय होतं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
advertisement
पुतीन यांना सलामी होती की अमेरिकेचं शक्तीप्रदर्शन होतं अशी चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शुक्रवारी अलास्कामध्ये ऐतिहासिक भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिलेली पहिली झलकच खास होती. रेड कार्पेटवर दोन्ही नेत्यांनी मोठ्या उत्साहात हस्तांदोलन केले. मात्र, या भेटीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, दोन्ही नेते रेड कार्पेटवर असताना त्यांच्या डोक्यावरून अमेरिकेचे शक्तिशाली B-2 बॉम्बर आणि F-22 रॅप्टर विमानांनी 'फ्लाईओवर' करत गर्जना केली.
advertisement
हे दृश्य जगाला थेट संदेश देत होते की, 'शांततेची चर्चाही ताकदीच्या छत्रछायेखालीच होते'. पुतीन रशियाहून अमेरिकेच्या लष्करी तळावर उतरले तेव्हा त्यांना अशा प्रकारच्या भव्य स्वागताची कल्पना नसावी. इतकंच नाही तर त्यांच्यासाठी विशेष कारची सोय केलेली असताना ट्रम्प स्वत:च्या गाडीतून त्यांना बैठकीसाठी घेऊन गेले.
पुतीन यांच्या डोक्यावरुन गेलेलं बॉम्बिंग जेट हे शक्ती प्रदर्शन, इशारा वजा स्वागत असं असल्याची चर्चा सुरू झाली. एका बाजूला हे पुतीन यांचे स्वागत होते, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेने आपली लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमधून दिसून आलं.
advertisement
B-2 बॉम्बरची ताकद
या फायटरला आकाशातलं भूत म्हणून ओळखलं जातं. रडारची नजर चुकवून शत्रूंवर 35 हजार फुटांवरुन निशाणा करून उडवण्यात हे फायटर जे माहीर आहे. B-2 स्पिरिट, ज्याला सामान्यतः B-2 स्टेल्थ बॉम्बर म्हणून ओळखले जाते, ते अमेरिकेच्या हवाई दलातील सर्वात शक्तिशाली विमानांपैकी एक आहे.
advertisement
१९८९ मध्ये पहिले उड्डाण घेतलेले हे विमान आजही जगातील सर्वात घातक आणि अभेद्य बॉम्बर मानले जाते. त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे, ते कोणत्याही सुरक्षित शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला भेदून आतमध्ये घुसून मोठा हल्ला करू शकते. दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेने याच बॉम्बरचा वापर करून इराणच्या अणु ठिकाणांवर यशस्वी हल्ला केला होता.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
वेलकम स्टाईल की पुतीनला इशारा? डोक्यावरुन गेलं बॉम्बिंग जेट अन्... VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement