8, 13, 8, 5, 13, 8! स्पेसमधून आला रहस्यमयी सिग्नल; डिकोडिंग केल्यानंतर शास्त्रज्ञांचीही उडाली झोप
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mystery Signal From Space : रिपोर्टनुसार सिग्नल एका विशिष्ट पॅटर्नमध्ये आला आहे. 8, 13, 8, 5, 13, 8. हे आकडे रँडम नाहीत, तर Fibonacci पॅटर्नसारखे आहेत. फिबोनाची क्रम हा एक असा गणितीय क्रम आहे ज्यामध्ये प्रत्येक पुढील अंक मागील दोन अंकांची बेरीज असतो
नवी दिल्ली : पृथ्वीशिवाय आणखीही दुसरं जग आहे असा दावा केला जातो. यादरम्यान वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. स्पेस म्हणजे अंतराळात सतत काही ना काही घडत असतं. अशीच एक रहस्यमयी घटना. स्पेसमधील एक गूढ सिग्नल आला. या सिग्नलचं डिकोडिंग केल्यानंतर शास्त्रज्ञांचीही झोप उडाली आहे.
3I/ATLAS मधून मिळालेला हा सिग्नल. 3I/ATLAS हा इंटरस्टेलर ऑब्जेक्ट म्हणजे अशी वस्तू जी आपल्या सौरमंडळाच्या बाहेरून आलेली आहे. सुरुवातीला त्याची गती आणि दिशेबद्दल चर्चा होती पण आता आलेल्या बातमीमुळे याचं गूढ अधिक वाढलं आहे. या वस्तूकडून एक विचित्र सिग्नल मिळाला आहे, जो सामान्य वैश्विक आवाजासारखा दिसत नाही.
advertisement
शास्त्रज्ञांना 3I/ATLAS वर जो हा सिग्नल मिळाला आहे तो 1420 मेगाहर्ट्झ (MHz) च्या फ्रिक्वेन्सीवर होता. या फ्रिक्वेन्सीला शास्त्रज्ञ हायड्रोजन लाइन म्हणतात. म्हणजेच विश्वातील सर्वात सामान्य घटक असलेल्या हायड्रोजनचा रेडिओ वेव्ह सिग्नल. SETI (सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटेलिजेंस) प्रोजेक्टमध्ये या फ्रिक्वेन्सीला इंटरस्टेलर कॉलिंग चॅनेल म्हणतात, ज्या चॅनेलवर बाहेर संस्कृतीशी संपर्क होण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
एमआयटी भौतिकशास्त्रज्ञ बोगदान सी. मॅग्लिच यांच्यासोबत काम करणारे चित्रपट निर्माते आणि संशोधक डेव्हिड सेरेडा यांनी 13 ऑक्टोबर 2025 रोजी 3I/ATLAS मधून बाहेर पडणाऱ्या असामान्य प्रकाश लाटा पाहिल्या. त्यांनी सांगितलं की हा प्रकाश फिबोनाची लयीत देखील चमकत होता.
रिपोर्टनुसार सिग्नल एका विशिष्ट पॅटर्नमध्ये आला आहे. 8, 13, 8, 5, 13, 8. हे आकडे रँडम नाहीत, तर Fibonacci पॅटर्नसारखे आहेत. फिबोनाची क्रम हा एक असा गणितीय क्रम आहे ज्यामध्ये प्रत्येक पुढील अंक मागील दोन अंकांची बेरीज असतो, जसे की 1, 2, 3, 5, 8, 13… हा नमुना केवळ गणितातच नाही तर निसर्गाच्या रचनेत देखील खूप सामान्य आहे. फुलांच्या पाकळ्या, सूर्यफुलाच्या बिया, कवचाची रचना आणि अगदी मानवी डीएनएमध्येही, असा पॅटर्न दिसून येतो.
advertisement
जर हाच पॅटर्न एखाद्या अवकाशातील वस्तूच्या सिग्नलमध्ये आढळला तर हा फक्त योगायोग आहे की एखाद्या बुद्धिमान संस्कृतीने जाणूनबुजून पाठवलेला सिग्नल आहे?, असा प्रश्न उपस्थित होतो.
सिग्नलचा अर्थ काय आहे?
या सिग्नलचा अर्थ उलगडल्यानंतर आलेल्या संदेशाने सर्वांना आश्चर्यचकित केलं. रिपोर्टनुसार सिग्नलमधून आलेले शब्द Observe. Prepare. Understand. The Gate Awaits. असे आहेत. याचा अर्थ, 'निरीक्षण करा, तयारी करा, समजून घ्या, गेट वाट पाहत आहे'
advertisement
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की सिग्नल अत्यंत स्थिर होता आणि सुमारे 15000 किलोमीटर अंतरावरून एकाच वेळी रेकॉर्ड केला गेला. याचा अर्थ असा की तो यांत्रिक किंवा डेटा त्रुटीचा परिणाम असू शकत नाही. जर हे सर्व खरं सिद्ध झालं तर मानवी इतिहासात पहिल्यांदाच आपल्याला दुसऱ्या आकाशगंगेतून जाणूनबुजून पाठवलेला संदेश मिळाला असेल.
advertisement
या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. काही जण याला परग्रही संस्कृतीशी संपर्क मानत आहेत, तर काही जण याला स्पेसमधील विनोद म्हणत आहेत. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आता कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. कधीकधी उपकरणातील त्रुटी, उपग्रह सिग्नल किंवा वैश्विक स्रोतातून येणाऱ्या रेडिओ लहरी अशा नमुन्यांमुळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, हा सिग्नल खरोखर कृत्रिम आहे की नैसर्गिक आहे हे निश्चित करण्यासाठी सध्या तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 06, 2025 2:52 PM IST
मराठी बातम्या/Viral/
8, 13, 8, 5, 13, 8! स्पेसमधून आला रहस्यमयी सिग्नल; डिकोडिंग केल्यानंतर शास्त्रज्ञांचीही उडाली झोप


