काही असे प्राणी जे बदलू शकतात आपला लिंग, वाचून थक्क व्हाल आगळ्यावेगळ्या जीवांची यादी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कोणी त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमुळे किंवा आगळ्या आवाजामुळे लोकांचं लक्ष वेधून घेतो. पण यामध्ये काही असेही जीव आहेत ज्यांच्याकडे एक भन्नाट क्षमता असते. ते आपलं लिंग (जेंडर) बदलू शकतात.
मुंबई : निसर्ग हा नेहमीच आश्चर्यकारक आणि गूढ गोष्टींनी भरलेला आहे. पृथ्वीवरील प्रत्येक प्रजातीचं अस्तित्व हे काही ना काही खास वैशिष्ट्यांवर अवलंबून असतं. कोणी आपल्या अनोख्या शरीररचनेमुळे जगभर प्रसिद्ध असतो, तर कोणी त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमुळे किंवा आगळ्या आवाजामुळे लोकांचं लक्ष वेधून घेतो. पण यामध्ये काही असेही जीव आहेत ज्यांच्याकडे एक भन्नाट क्षमता असते. ते आपलं लिंग (जेंडर) बदलू शकतात.
हे ऐकायला नक्कीच अजब वाटतं, पण ही गोष्ट खरी आहे. वैज्ञानिक भाषेत याला “Sexual Transformation” किंवा “Gender Fluidity in Nature” असं म्हटलं जातं. म्हणजेच, हे जीव परिस्थितीनुसार मेल (पुरुष) ते फीमेल (स्त्री) किंवा उलटं अशा प्रकारे लिंगबदल करू शकतात. चला तर मग पाहूया अशा काही अनोख्या जीवांविषयी
पॅरटफिश (Parrotfish)
पॅरटफिश सामान्यतः फीमेल (स्त्री) म्हणून जन्माला येतात आणि मोठ्या वयात मेल (नर) मध्ये रूपांतरित होतात. गंमत म्हणजे, लिंग बदलताना या माशांचा शरीराचा रंगसुद्धा बदलतो आणि तो आणखी अधिक आकर्षक व चमकदार दिसतो.
advertisement
क्लाउनफिश (Clownfish)
क्लाउनफिश हे जन्मतः नर असतात. हे माशांचे समूह बनवून राहतात आणि त्या समूहात सर्वात मोठी व प्रभावी मच्छी ही मादी असते. जर ती मादी मरण पावली, तर त्या समूहातील सर्वात मोठा नर क्लाउनफिश आपलं लिंग बदलून मादी होतो आणि पुढे प्रजनन प्रक्रिया सुरू राहते
फ्लॅटवॉर्म (Flatworm)
फ्लॅटवॉर्मला मराठीत चपटे कृमी म्हटलं जातं. हे उभयलिंगी (Hermaphrodite) असतात, म्हणजेच त्यांच्याकडे नर आणि मादी दोन्ही प्रकारची प्रजनन अंगं असतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार ते आपलं लिंग बदलू शकतात.
advertisement
गोबी (Goby)
गोबी ही एक लहानसा मासा आहे आणि तो खाऱ्या तसेच गोड्या पाण्यातही आढळतो. जर एखाद्या फीमेल गोबीला जोडीदार मिळाला नाही, तर ती स्वतःहून आपलं लिंग बदलून नरामध्ये रूपांतर करते. हा त्यांच्या अस्तित्व टिकवण्याचा हुशार मार्ग आहे.
झींगा (Shrimp – लिस्माटा प्रजाती)
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, लिस्माटा प्रजातीचे झींगे सुरुवातीला मेल (नर) म्हणून जन्म घेतात. जसजसे ते मोठे होतात तसतसे फीमेलमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे त्यांनाही उभयलिंगी (Hermaphrodite) म्हणतात.
advertisement
निसर्गाची ही खरोखरच विलक्षण देणगी आहे. प्रजातींचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि प्रजनन सुरू राहण्यासाठी या जीवांना लिंगबदल करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. ही प्रक्रिया फक्त विज्ञानासाठीच नाही तर निसर्गाच्या अद्भुततेचं एक उत्तम उदाहरण मानली जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 10:00 PM IST
मराठी बातम्या/Viral/
काही असे प्राणी जे बदलू शकतात आपला लिंग, वाचून थक्क व्हाल आगळ्यावेगळ्या जीवांची यादी