36,000 फूटांवर काहीतरी आदळलं, विंडशिल्ड तुटली आणि.... बोईंग 737 च्या थरारक अपघातानं सगळेच हादरले
- Published by:Devika Shinde
Last Updated:
विमान आकाशात 36,000 फूट उंचीवर झेपावत असताना त्याच्या कॉकपिटच्या समोरील काच अचानक तडकली आणि विमान खाली कोसळलं, या अनपेक्षित प्रसंगात एका पायलटला दुखापत झाली.
मुंबई : 16 ऑक्टोबर रोजी घडलेली ही घटना चित्रपटातील एखाद्या थरारक प्रसंगासारखी होती. खरंतर एक थरारक विमान अपघत घडला. विमान आकाशात 36,000 फूट उंचीवर झेपावत असताना त्याच्या कॉकपिटच्या समोरील काच अचानक तडकली आणि विमान खाली कोसळलं, या अनपेक्षित प्रसंगात एका पायलटला दुखापत झाली. UA1093 या उड्डाणात 140 प्रवासी आणि कर्मचारी होते. सर्व काही नेहमीप्रमाणे चालले होते, पण अचानकच कॉकपिटमधून आलेल्या तीव्र आवाजाने वातावरण बदलले.
पायलटनी तातडीने नियंत्रण घेतले आणि विमानाची उंची 36,000 फूटांवरून 26,000 फूटांपर्यंत कमी केली. शेवटी त्यांनी विमानाला सुरक्षितपणे सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवले. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या बोईंग 737 मॅक्स 9 विमानात बसवून सहा तासांच्या विलंबानंतर त्यांना लॉस एंजेलिसला पोहोचवण्यात आले.
विंडशील्ड का तडकले?
सामान्यतः विमानांच्या समोरील काचा अत्यंत मजबूत असतात. त्या पक्ष्यांच्या धडका, दाबातील बदल आणि इतर अनेक गोष्टी सहज सहन करू शकतात. मात्र या घटनेत काहीतरी वेगळेच घडले. ऑनलाइन शेअर झालेल्या छायाचित्रांमध्ये काचेवर जळाल्याचे डाग आणि पायलटच्या हातावर झालेली सूज स्पष्ट दिसत होती. हे फक्त साधे तडे नव्हते. काहीतरी बाहेरील शक्तीने विमानावर आघात केला होता.
advertisement
तज्ञांचे मत आहे की, ही काच अंतराळातील एखाद्या सूक्ष्म उल्कापिंडाने किंवा स्पेस डेब्रीने धडकून फुटली असावी. इतक्या प्रचंड वेगाने प्रवास करणारी वस्तू, अगदी मजबूत काचसुद्धा छिन्नभिन्न करू शकते. ही घटना डेन्व्हरहून लॉस एंजेलिसकडे उडणारा युनायटेड एअरलाईन्सचा बोईंग 737 मॅक्स 8 विमानासोबत घडली.
Windshield SHATTERS on Boeing 737 MAX flying from Denver to LA
'Space debris or small meteorite' as officials cause — pilot injured pic.twitter.com/bpqmWCz6AU
— RT (@RT_com) October 19, 2025
advertisement
विमान सॉल्ट लेक सिटीपासून सुमारे 322 किमी आग्नेयेकडे असताना ही घटना घडली. पायलटनी आपत्कालीन प्रक्रिया तत्काळ सुरू केल्या आणि सर्वांना सुरक्षित ठेवत विमान उतरवले. युनायटेड एअरलाईन्सच्या माहितीनुसार, कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही आणि पायलटची दुखापत किरकोळ स्वरूपाची आहे. मात्र कंपनीने अद्याप या घटनेचे कारण स्पष्ट केलेले नाही.
याच आठवड्यात 18 ऑक्टोबर रोजी युनायटेड एअरलाईन्सच्या आणखी एका विमानाने शिकागोच्या ओ’हारे विमानतळावर गेटकडे जाताना दुसऱ्या विमानाच्या शेपटीला धडक दिली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही आणि 113 प्रवासी थोड्या विलंबानंतर सुरक्षितपणे उतरले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 7:19 PM IST
मराठी बातम्या/Viral/
36,000 फूटांवर काहीतरी आदळलं, विंडशिल्ड तुटली आणि.... बोईंग 737 च्या थरारक अपघातानं सगळेच हादरले