advertisement

नवरदेवाच्या त्या कृत्यामुळे वैतागली; स्टेजवरच नवरीने लगावली कानशिलात, Video पाहून नेटकरी शॉक

Last Updated:

व्हिडिओमध्ये वराला काहीतरी गोड खाऊ घालण्याचा विधी सुरू आहे. मात्र हे खाताना वराने थोडं नाटक केलं. यानंतर जे घडलं ते पाहून तिथे उपस्थित लोक थक्क झाले.

लग्नातील व्हिडीओ व्हायरल
लग्नातील व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली : सोशल मीडियावर दिवसभरात अनेक निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, लोकांना सगळ्यात जास्त ते व्हिडीओ आवडतात, ज्यात काहीतरी मजेशीर असतं. विशेषतः एखाद्या कार्यक्रमात जर काहीतरी अतिशय अजब घ़डलं, तर त्याचा व्हिडीओ लगेचच व्हायरल होतो. सध्या लग्नातला असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
लग्नाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान नुकताच असाच एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये वराला काहीतरी गोड खाऊ घालण्याचा विधी सुरू आहे. मात्र हे खाताना वराने थोडं नाटक केलं. यानंतर जे घडलं ते पाहून तिथे उपस्थित लोक थक्क झाले.
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्टेजवर वधू-वर उपस्थित असल्याचं दिसून येत आहे. विधीचा एक भाग म्हणून, वधूला स्वतःच्या हाताने वराला मिठाई खायला द्यायची असते. वराने यावेळी नाटक सुरू केलं आणि दोनदा मागे सरकला. तिसऱ्यांदा, वधू मिठाई घेते आणि ती थेट वराच्या तोंडात टाकते. इतकंच नाही तर या कृत्यासाठी पुढे त्याला जोरदार चापटही मारते. व्हिडिओ खूपच मजेदार आहे. लिंकवर क्लिक करून पाहू शकता व्हिडीओ 
advertisement
nikaah_shadi नावाच्या अकाऊंटवरून हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावर लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काही युजरने लिहिलं - वधू नक्कीच शिक्षिका असेल. यावर आणखी एका यूजरने लिहिलं की, नवरदेव हा बॅकबेंचर आहे. आणखी एका यूजरने लिहिलं - बिचारा नवरदेव मस्करी करत होता, मॅडम सीरियस झाल्या.
view comments
मराठी बातम्या/Viral/
नवरदेवाच्या त्या कृत्यामुळे वैतागली; स्टेजवरच नवरीने लगावली कानशिलात, Video पाहून नेटकरी शॉक
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement