Video : ... आणि रस्त्यावर चालू लागली स्कुटी; नशिब हे कॅमेरात कैद झालं नाहीतर कोणी विश्वासच ठेवला नसता
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या व्हिडीओत असं काही दिसत आहे की जे पाहून तुम्ही म्हणाल की बरं झालं हे पाहिलं नाही तर कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. आता तुम्हा हे ऐकून नक्कीच उत्सुकता असेल की नक्की असं या व्हिडीओत काय आहे.
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही, इथे नेहमी असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात, जे आपल्याला कधी हसवतात, तर कधी माहिती देतात, तर कधी विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.
या व्हिडीओत असं काही दिसत आहे की जे पाहून तुम्ही म्हणाल की बरं झालं हे पाहिलं नाही तर कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. आता तुम्हा हे ऐकून नक्कीच उत्सुकता असेल की नक्की असं या व्हिडीओत काय आहे.
तर हा व्हिडीओ एका बैलाचा आहे, ज्यामध्ये तो स्कुटी चालवताना दिसत आहे.
advertisement
हो हे खरं आहे. हा बैल स्कुटी चालवत आहे. त्याच्यावर चक्क स्कुटी चोरल्याचा आरोप देखील अनेकांनी लावला आहे.
व्हिडीच्या सुरुवातीला तुम्ही रस्त्यावर बैल चालताना दिसत आहे. पण त्याला मध्येच काहीतरी होतं आणि तो थेट जवळ पार्क केलेल्या स्कुटीवर आपले पुढचे दोन पाय ठेवतो आणि मागी चालवू लागलो आणि तो चक्क ती स्कुटी घेऊन तिथून पळ काढतो. जणू खादा चोरच गाडी घेऊन पळाला आहे. बैलाचं माणसासारखं हे कृत्य पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.
advertisement
इंसानों को स्कूटी चोरी करते हुए बहुत बार देखा होगा लेकिन ऋषिकेश में स्कूटी चोरी का मामला कुछ अलग है। यहां गली में घूमने वाले आवारा सांड भी बाइक स्कूटी का शौक रखते है। pic.twitter.com/37TRoCzhcb
— bhUpi Panwar (@askbhupi) May 2, 2025
advertisement
ही स्कूटी 10-12 सेकंद फुल वेगात धावते आणि अखेर धडाम! एका भिंतीला जाऊन ही गाडी आदळते आणि स्कूटी थांबते. बैल मात्र कसाबसा आपला तोल सावरतो आणि शेपूट हलवत तिथून निवांत निघून जातो... जणू काहीच घडलंच नाही!
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. व्हिडीओ खाली कमेंट्सचा जणू काही पुरच आसल्यासारख्या सारख्या कमेंट्स येत आहेत. कोणी म्हणतंय, "बैलानं स्कूटी चोरी केली का काय?", तर कुणी हसून म्हणतं "आता बैलांचं वाहनप्रेमही उफाळून आलंय."
advertisement
हा भन्नाट व्हिडीओ ट्विटर/X वर @askbhupi या युजरने शेअर केला आहे आणि सध्या लाखो लोकांना हा व्हिडीओ हसवतोय शिवाय या जगाता काहीही होऊ शकतो यावर विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 03, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : ... आणि रस्त्यावर चालू लागली स्कुटी; नशिब हे कॅमेरात कैद झालं नाहीतर कोणी विश्वासच ठेवला नसता