Earth: 2025 मध्ये पृथ्वीवर भयानक संकट, मानवाचा अंत? स्टीफन हॉकिंगची भविष्यवाणी, नवा रिपोर्ट समोर

Last Updated:

ही रहस्यमय वस्तू मंगळ, गुरू आणि शुक्र ग्रहाच्या जवळून जाणाऱ्या एका अतिशय असामान्य मार्गावर जात आहे.

News18
News18
आजपर्यंत इतिहास पाहिला तर कोणत्या संस्कृती अथवा सजीव सृष्टीचा नाश हा त्याच्या दुप्पट शक्तिशाली संस्कृतीमुळे झाला आहे. स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या अनेक संशोधनात याचा उल्लेख केला असून  जर माणसांनी एलियन्सशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते मानवी जीवनासाठी विनाशकारी ठरू शकतं. स्टीफन हॉकिंगचा असा विश्वास होता की, एलियन्स आपल्यापेक्षा खूप प्रगत असू शकतात. आपण आपल्या पृथ्वीवर शांत राहिलं पाहिजं आणि आपली उपस्थिती जाहीर करू नये. पृथ्वीला शांत ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असं हॉकिंग यांनी म्हटलं आहे.
advertisement
तो इशारा खरा ठरला तर..? 
हार्वर्डचे शास्त्रज्ञ प्राध्यापक अवी लोएब यांनी एका रहस्यमय वस्तू 3I/ATLAS बद्दल इशारा दिला आहे आणि म्हटले आहे की, जूनच्या शेवटच्या दिवसांपासून ही वस्तू पृथ्वीकडे सरकत आहे. ही रहस्यमय वस्तू मंगळ, गुरू आणि शुक्र ग्रहाच्या जवळून जाणाऱ्या एका अतिशय असामान्य मार्गावर जात आहे. प्राध्यापक अवी लोएब पुढे म्हणाले की,  ही वस्तू कृत्रिम असू शकते आणि ती एखाद्या परग्रही व्यक्तीनं पाठवली असण्याची शक्यता देखील आहे.
advertisement
'पृथ्वीसाठी कडक सुरक्षा करावी लागेल'
'या परग्रही व्यक्तीचा उद्देश मैत्री किंवा शत्रुत्व असू शकतं, परंतु जर हे सिद्ध झालं की ही रहस्यमय वस्तू एखाद्या परग्रही व्यक्तीने पाठवली आहे, तर ती मानवी संस्कृतीसाठी एक मोठा धोका असू शकते. त्यांच्या संशोधन पत्रात प्राध्यापक लोएब यांनी लिहिले की, जर हे सिद्ध झाले की ही रहस्यमय वस्तू काही तंत्रज्ञानाने बनलेली आहे, तर ती निश्चितच मानवांसाठी धोका असू शकतो आणि त्यावर उपाय म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था करावी लागू शकते, परंतु सर्व सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरण्याची शक्यता देखील आहे, असंही अवी लोएब यांनी म्हटलं आहे.
advertisement
या दिवशी जाणार पृथ्वी जवळून!
अशी माहिती समोर आली आहे की, ही रहस्यमय वस्तू १७ डिसेंबर रोजी पृथ्वीपासून २२३ दशलक्ष मैल अंतरावर जाणार आहे. या वस्तूचा वेग सध्या ४१ मैल प्रति सेकंद आहे. या घटनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Earth: 2025 मध्ये पृथ्वीवर भयानक संकट, मानवाचा अंत? स्टीफन हॉकिंगची भविष्यवाणी, नवा रिपोर्ट समोर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement