Snake Fact : भारतीय कोब्रा की किंग कोब्रा माणसाला कोणापासून जास्त धोका? एक्सपर्ट्स काय सांगतात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
किंग कोब्रा आणि भारतीय कोब्रा हे दोन्ही साप धोकादायक आहेत, परंतु माणसाला सर्वात जास्त धोका कोणत्या सापापासून आहे? तुम्हाला माहितीय?
मुंबई : साप हे प्राणी जगभरात आढळतात आणि त्यांच्याशी संबंधीत खूप जुनी आणि रहस्यमय कहाणी देखील आहेत. जवळजवळ 3,789 प्रजाती असलेले साप हे अनेक संस्कृतींमध्ये भीती आणि आदराचे प्रतिक आहेत. काही साप बिनविषारी असले तरी काही सापांमध्ये विष असते जे प्राणघातक देखील ठरू शकते. आज आपण दोन प्रसिद्ध सापांबद्दल बोलणार आहोत. किंग कोब्रा आणि भारतीय कोब्रा - आणि कोणता साप जास्त धोकादायक आहे याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला थोडी माहिती ही मिळेल आणि सापांबद्दल भीती कमी होईल.
किंग कोब्रा, त्याच्या भव्य आकार आणि प्राणघातक विषासाठी ओळखला जातो, तो एक डेंजर सरपटणारा प्राणी आहे, तर दुसरीकडे, भारतीय कोब्रा, तो जरी लहान असला तरी तो भारतात आढळणारा एक अत्यंत धोकादायक साप आहे. दोन्ही साप कोब्रा कुटुंबातील आहेत, परंतु जेव्हा गोष्ट माणसाच्या जीवाची असते तेव्हा दोघांपैकी सर्वात धोकादायक विष कोणाचं आहे जे माणसाला मारु शकतं असा प्रश्न निर्माण होतो.
advertisement
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, किंग कोब्राच्या तुलनेत भारतीय कोब्रा मानवांसाठी जास्त धोकादायक असू शकतो. किंग कोब्रा, जगातील सर्वात मोठा विषारी साप असूनही, तो कमी आक्रमक म्हणून ओळखला जातो आणि सहसा हल्ला करत नाही. जेव्हा तो चावतो तेव्हा तो मोठ्या प्रमाणात विष सोडतो, परंतु त्याची आक्रमकता तुलनेने कमी असते.
दुसरीकडे, भारतीय कोब्रा, मानवी वस्तीजवळ राहतो आणि तो रागीट स्वभावाचा आहे. त्याचा आकार लहान असला तरी तो कोणत्याही संकटाला त्वरित प्रतिसाद देतो, ज्यामुळे तो माणसासाठी धोकादायक आहे. त्याची ही सवय आणि माणसांशी वारंवार होणारे सामने यामुळे भारतीय कोब्रा हा एक असा साप आहे ज्याच्याशी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Snake Fact : भारतीय कोब्रा की किंग कोब्रा माणसाला कोणापासून जास्त धोका? एक्सपर्ट्स काय सांगतात









