Hotel Secrets : हॉटेलच्या रुममध्ये गेल्यावर सर्वात आधी लाईट लावता? मग इथेच मोठी चुक करता, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक गोष्ट

Last Updated:

आता तुम्हाला हे वाचल्यानंतर अनेक प्रश्न पडतील आणि हे असं का आणि कशासाठी म्हटलं जातंय? यासारखे असंख्य प्रश्न उपस्थीत रहातील. तज्ज्ञांचा म्हणण्यानुसार, ही सवय प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. कसं काय? चला वाचू सविस्तर

AI generated Photo
AI generated Photo
मुंबई : हल्ली लोक मित्र किंवा कुटुंबासोबत फिरायला जाणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे आणि हा जणू एक ट्रेंडसुद्धा बनला आहे. शिवाय, कुठेही प्रवास केल्यास तिथे काही काळ मुक्काम करण्यासाठी हॉटेल किंवा होम-स्टे शोधावा लागतो, ज्यामुळे आपण हॉटेल्स बुक करतो. परंतु, हॉटेलमध्ये प्रवेश करताच बहुतेक लोक एक सोपी पण चुकीची सवय करतात, ते म्हणजे खोलीत घुसताच लाईट चालू करणे. आपल्यापैकी जवळजवळ 99 टक्के लोक हेच करतात. पण खरंतर ही चुकीची सवय आहे.
आता तुम्हाला हे वाचल्यानंतर अनेक प्रश्न पडतील आणि हे असं का आणि कशासाठी म्हटलं जातंय? यासारखे असंख्य प्रश्न उपस्थीत रहातील. तज्ज्ञांचा म्हणण्यानुसार, ही सवय प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. कसं काय? चला वाचू सविस्तर
हॉटेल व्यवसायातील तज्ज्ञ हेली व्हिटिंग सांगतात की, हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच लाईट चालू न करणे सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ढेकूण (Bed Bugs). हे छोटे, पंखहीन कीडे गडद पिवळसर, लालसर किंवा तांबूस रंगाचे असतात. त्यांचे शरीर चपटे आणि अंडाकार असते. हे कीडे मानव आणि प्राण्यांचे रक्त पितात आणि रात्री अधिक सक्रिय असतात.
advertisement
ते सहसा उघड्या शरीराच्या भागांवर, जसे डोके, हात आणि पाय यांना चावतात. त्यांच्यामुळे अंगावर लाल चकत्ते पडतात, ज्यामुळे खाज आणि जळजळ होते आणि ही समस्या काही काळ टिकू शकते.
हेली व्हिटिंग प्रवाशांना सांगतात की, हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच पहिले पाऊल म्हणून खटमल शोधणे आवश्यक आहे. गादी, उशी, पडदे आणि फर्निचरच्या तुटक्या भागांमध्ये हे कीडे लपलेले असतात. खोलीत छोटे लाल किंवा तांबूस रंगाचे कीडे किंवा रक्ताचे डाग दिसले, तर हे ढेकूण असल्याचे स्पष्ट चिन्ह आहे.
advertisement
जर प्रवाशांना खटमल दिसले, तर त्यांनी लगेच फोटो काढणे आणि सर्व माहिती नोंदवणं गरजेचं आहे, जसे की चेक-इनचा वेळ, खोलीचा नंबर इत्यादी. त्यानंतर हॉटेल मॅनेजर किंवा रिसेप्शनला तत्काळ याची माहिती द्यावी. बहुतेक हॉटेल अशा परिस्थितीत नवीन खोली देतात किंवा पैसे परत करतात, जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरण मिळावे.
सुरक्षा टिप्स:
advertisement
खोलीत प्रवेश करताच लाईट लावू नका.
गादी, पडदे, उशी आणि फर्निचर नीट तपासा.
खटमल दिसल्यास फोटो काढा आणि त्वरित हॉटेलला कळवा.
हॉटेलमध्ये सुरक्षित राहण्यासाठी या सवयी अवलंबा.
या सवयींचे पालन केल्यास प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित राहील, तसेच खटमलमुळे होणारा त्रास टाळता येईल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Hotel Secrets : हॉटेलच्या रुममध्ये गेल्यावर सर्वात आधी लाईट लावता? मग इथेच मोठी चुक करता, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक गोष्ट
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement