अरे देवा! आता कोणतं संकट? तो मासा दिसल्याने उडाली खळबळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
पौराणिक कथेत, त्याला 'समुद्रातील ड्रॅगन गॉड ऑफ पॅलेसचा संदेशवाहक' मानले जाते. त्यामुळे लोक याला अशुभ मानतात.
नवी दिल्ली : जगावर कधी कोणतं संकट येईल माहिती नाही. अशा बर्याच घटना आहेत ज्याचा संबंध जगावरील संकटांचे संकेत म्हणून त्यांच्याशी जोडला जातो. अशीच एक विचित्र घटना घडली ती मेक्सिकोत.
मेक्सिकोतून असा मासा समुद्र किनाऱ्यावर दिसला आहे. ज्याला अशुभ मानतात. असं म्हणतात की हा मासा जेव्हा कधी पृथ्वीवर येतो तेव्हा तो विनाशाचे भयानक दृश्य घेऊन येतो. दक्षिण बाजा कॅलिफोर्निया द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर हा मासा दिसला. ज्यामुळे लोक चिंतेत आहे.
यावर्षी 2025 मध्ये हा मासा पहिल्यांदाच मेक्सिकोच्या किनारपट्टीवर दिसला आहे. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या तरुण सर्फरने मासे गंभीररीत्या जखमी झाल्याने तात्काळ उचलून पुन्हा समुद्रात सोडलं.
advertisement
डेली मेल या इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, एका स्थानिक रहिवाशाने त्यांना सांगितले की, जेव्हा हा मासा समुद्रातून बाहेर येतो, तेव्हा ते मजबूत त्सुनामीच्या आगमनाचे संकेत देते. तथापि, शास्त्रज्ञांनी हा मासा आणि आपत्ती यांच्यात कोणताही स्पष्ट संबंध स्थापित केलेला नाही.
ओरफिश असं या माशाचं नाव. या माशाची लांबी सर्फबोर्डएवढी असून त्याचे शरीर पूर्णपणे चांदीचं आहे. याशिवाय, त्याच्या शरीरावर एक पंख देखील असतो, ज्यामुळे तो इतर माशांपेक्षा वेगळा असतो.
advertisement
ऑरफिश 36 फूट लांब आणि 441 पौंडांपेक्षा जास्त वजनाचा असू शकतो, शास्त्रज्ञांच्या मते, हा मासा सहसा समुद्राच्या खोलवर आढळतो. ज्याची उंची 656 फूट ते 3,280 फूट असू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच्या त्वचेवर कोणतेही खवले नाहीत. त्याचा तीक्ष्ण थर ग्वानिन नावाच्या पदार्थाने झाकलेला असतो.
असं म्हटलं जातं की जेव्हा कोणी हा मासा पृथ्वीवर पाहतो तेव्हा पृथ्वीवर विनाश निश्चित होतो. गेल्या वर्षी कॅलिफोर्नियामध्ये एक ओरफिश दिसला होता, त्यानंतर काही आठवड्यांनी 7 तीव्रतेचा भूकंप झाला होता.
advertisement
2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या विनाशकारी त्सुनामी आणि 9.0 तीव्रतेच्या भूकंपाच्या काही महिन्यांपूर्वी तेथील समुद्रकिनाऱ्यावर 20 हून अधिक मासे मृतावस्थेत आढळले होते. पौराणिक कथेत, त्याला 'समुद्रातील ड्रॅगन गॉड ऑफ पॅलेसचा संदेशवाहक' मानले जाते. त्यामुळे लोक याला अशुभ मानतात. तथापि, विज्ञानाने या विश्वासाची पुष्टी केलेली नाही. हा केवळ योगायोग मानला जाऊ शकतो.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Jan 26, 2025 9:59 AM IST









