Toothpaste : तुमची टूथपेस्ट नकली तर नाही ना? गुजरातमध्ये सापडला बनावट प्रोडक्टचा कारखाना
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुमच्या टूथपेस्टमध्ये नमक आहे का? विचारणं सोडा आता तुमची टूथपेस्ट खरी आहे का? असा प्रश्न उपस्थीत झाला आहे.
मुंबई : दररोज सकाळची सुरुवातच होते ती दात घासण्याने. तोंडाची स्वच्छता आणि आरोग्य टिकवण्यासाठी टूथपेस्ट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच आपण नेहमीच चांगल्या आणि नामांकित कंपनीचा टूथपेस्ट वापरतो, असं गृहीत धरलं जातं. पण कल्पना करा, जर तुमचाच टूथपेस्ट बनावट निघाला तर?
होय, असा प्रकार हल्लीच घडला आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे पोलिसांनी नकली टूथपेस्ट तयार करणाऱ्या कारखान्याचा भंडाफोड केला आहे. आता या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे, “आपला ‘कोलगेट’ही बनावट तर नाही ना?” बनावट टूथ पेस्ट आमच्या घरात तर नाही आलं ना?
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी रेड टाकण्यात आली ती एक नकली टूथपेस्ट तयार करणारी फॅक्ट्री होती. या ठिकाणी मोठमोठ्या ड्रममध्ये बनावट टूथपेस्ट तयार करून ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्या टूथपेस्टला नामांकित ब्रँडच्या डब्यांमध्ये पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवलं जात होतं. तपासात हेही दिसून आलं की फॅक्टरीमध्ये पॅकिंग मशीनपासून ते कंपनीच्या नावाचे डबे सर्व काही व्यवस्थित लावलेले होते, ज्यामुळे खरे-खोटे ओळखणे कठीण होतं.
advertisement
चित्रोड गावातील या फॅक्ट्रीवर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा मारला. तपासादरम्यान पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 9 लाख रुपयांचा बनावट टूथपेस्ट जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, पोलिस आता तपास करत आहेत की ही फॅक्ट्री किती दिवसांपासून चालू होती आणि या बनावट टूथपेस्टची सप्लाय कोणकोणत्या ठिकाणी केली गेली आहे.
advertisement
अशा प्रकारे रोजच्या वापरातील वस्तूंमध्येही मिलावट आणि बनावट उत्पादनं आढळत असल्याने ग्राहकांनी सावध राहणं आता काळाची गरज आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 5:24 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Toothpaste : तुमची टूथपेस्ट नकली तर नाही ना? गुजरातमध्ये सापडला बनावट प्रोडक्टचा कारखाना