advertisement

दे धक्का! पण गाडीला नाही तर जमिनीला; काय आहे हा प्रकार VIDEO पाहा

Last Updated:

एक असं ठिकाण जिथं लोकांना जमिनीला द्यावा लागतो धक्का.

फोटो - Youtube/ AirFox Photography
फोटो - Youtube/ AirFox Photography
वॉशिंग्टन, 03 सप्टेंबर :  तुम्ही आजवर एखाद्या गाडीला धक्का देताना पाहिलं आहे. पण एक असं ठिकाण जिथं चक्क जमिनीलाच धक्का देतात. कित्येक लोक एकत्र येत एक जमीन सरकवतात. वाचूनच तुम्हाला विचित्र वाटलं असेल. जमिनीला लोक का आणि कसा काय धक्का देतात, असं तुम्ही म्हणाल. हा नेमका काय प्रकार आहे ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल.
अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमध्ये  'चिप्पेवा' नावाचं तलाव आहे. ज्यामध्ये एक तरंगणारे 'बेट' आहे. हे बेट 40 एकरात पसरलं आहे, ज्याचा पृष्ठभाग दलदलीचा आहे. यामुळेच या बेटाला 'चिप्पेवा फ्लोएज फ्लोटिंग बोग' असंही म्हणतात. हे बेट काहीवेळा लोकांसाठी त्रासाचं कारण बनतं. यामुळे पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडणारा चिप्पेवा तलावावरील एकमेव पूल बंद होतो. पुलावरील वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे लोकांना दरवर्षी हे बेट बोटीने ढकलावं लागतं.
advertisement
odditycentral च्या अहवालानुसार, दरवर्षी एकदा डझनभर स्थानिक बोट मालक सरोवराच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडणाऱ्या पुलापासून बेट दूर ढकलण्यासाठी एकत्र काम करतात. एका स्थानिक व्यक्तीने नॉर्दर्न न्यूज नाऊला सांगितलं की, जेव्हा तुम्ही सकाळी इथं येता, तेव्हा सर्वात आधी हे दलदलीचं बेट कुठे आहे, ते पाहता.
advertisement
चिप्पावे फ्लोवेज वेबसाईटवरील माहितीनुसार, हे बेट तरंगताना दिसत नाही. त्यावर अनेक झाडं आहे. जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा ही झाडे पालांसारखी काम करतात, ज्यामुळे बेट तरंगू लागतं. जेव्हा ते पुलाजवळ येतं, तेव्हा ते लोकांसाठी डोकेदुखी ठरतं.  बोटींनी हे बेट ढकलण्याशिवाय कोणताही मार्ग उरला नाही. तरंगत्या बेटाला पुलापासून दूर ढकलण्यासाठी गेल्या वर्षी 25 बोटींचा वापर करण्यात आला होता.
advertisement
AirFox Photography युट्यूब चॅनेलवर तरंगत्या बेटाचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओत बोटी बेटाला ढकलत पुलापासून दूर नेताना दिसत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
दे धक्का! पण गाडीला नाही तर जमिनीला; काय आहे हा प्रकार VIDEO पाहा
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement