माश्यांचा ज्युस, लोक दूरुन दूरुन येतात प्यायला; VIDEO पाहून येईल किळस

Last Updated:

खाण्याच्या पदार्थांचे नवनवे ट्रेंड सोशल मीडियावर समोर येत असतात. पदार्थांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी टाकत फूड फ्युजन तयार केलं जातं. लोकही हे फूड फ्युजन आवडीनं खातात.

माश्यांचा ज्युस
माश्यांचा ज्युस
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : खाण्याच्या पदार्थांचे नवनवे ट्रेंड सोशल मीडियावर समोर येत असतात. पदार्थांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी टाकत फूड फ्युजन तयार केलं जातं. लोकही हे फूड फ्युजन आवडीनं खातात. यामध्ये काही खूप विचित्र खाद्यपदार्थही असतात ज्यांना पाहून काही लोक संताप व्यक्त करतात तर काही लोक आवडीनं अशा पदार्थांवर ताव मारतात. रोज काही ना काही नवीन पदार्थ इंटरनेटवर व्हायरल होत असतो. सध्या माशीचा ज्यूस चर्चेत आला आहे.
आग्रा येथील दुकानातील मिक्स फ्रूट चाट आणि ज्यूस खूप प्रसिद्ध आहे. इथे ज्यूस बनवला की लगेच विकला जातो. लांबून लांबून लोक हा ज्युस प्यायला येतात. दुकानाबाहेर रांगाच रांगा लागलेल्या असतात. मात्र एका फूड ब्लॉगरने या ज्युस मागचं सत्य उघडकीस आणलं आहे. त्यानं हा ज्युट बनवण्याची प्रक्रिया दाखवली. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही हा ज्युस पिण्याचा विचारही करणार नाही.
advertisement
हा व्हिडिओ आग्राच्या ज्यूसच्या दुकानातच रेकॉर्ड करण्यात आला आहे. फूड ब्लॉगरला प्रसिद्ध असल्यामुळे त्यानं या प्रसिद्ध ज्युसचा मेकिंग व्हिडीओ बनवला. मात्र त्याला प्रत्यक्षात वेगळंच दिसलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक ज्युससाठी फळे कापत आहेत. मात्र आजूबाजूला अनेक माशा उडताना दिसल्या. यानंतर बर्फाचा ब्लॉक धुऊन त्याची पावडर बनवण्यात आली. बर्फाचा चुरा झाल्यावर दूध थेट पेटीतून रसाच्या डब्यात ओतले. या दुधात माश्या होत्या. दूध न गाळताच तसंच टाकलं. माशीही रसात चिरडली. या घाणीत तयार केलेला ज्यूस पिण्यासाठी लोक लांबून येतात. व्हिडिओ शेअर होताच तो व्हायरल झाला.
advertisement
advertisement
ASHISH SINGH CHAUHAN नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केलाय. आणि असा ज्युस पिण्यासाठी लोक तासनतास वाट पाहतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
माश्यांचा ज्युस, लोक दूरुन दूरुन येतात प्यायला; VIDEO पाहून येईल किळस
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement