Viral News : मुलीने 3 दिवसात सोडली नोकरी, असं कारण दिलं की लोकही संतापले
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लोक निरनिराळ्या कारणांवरुन आपली नोकरी बदलत असतात. कोणी महिन्याभरात, एक वर्षात या कालावधीत लोक नोकरी बदलतात. यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असतात.
नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : लोक निरनिराळ्या कारणांवरुन आपली नोकरी बदलत असतात. कोणी महिन्याभरात, एक वर्षात या कालावधीत लोक नोकरी बदलतात. यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असतात. यामध्ये अनेक मजेशार, विचित्र प्रकारही ऐकायला, वाचायला मिळतात. सध्या अशीच एक नोकरी सोडल्याची घटना समोर आली आहे. तरुणीनं अवघ्या तीन दिवसांत नोकरीचा राजीनामा दिला. तीन दिवसांत नोकरी सोडण्याचं कारणही तिनं सोशल मीडियावर शेअर केलं. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
एका तरुणीनं 3 दिवसांत नोकरीला रामराम ठोकला. यामागचं कारण तिनं रेडिटवर पोस्ट करत शेअर केली. सी पोस्ट सध्या इंटरनेटंवर व्हायरल होत असून चर्चेत आली आहे.
तरुणीनं सांगितलं की, बॉसने मला कोणतंही काम दिलं नाही आणि तरीही काम न केल्यावरुन फटकारलं. ती ऑफिसमध्ये काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ थांबत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. इतर ऑफिसमधील लोक मला काम द्यायचे ते मी पूर्ण करायचे. बॉसने मला विचारले की, तुला काही मानसिक आरोग्याशी संबंधित आजार आहे का? तेव्हा मी म्हणाले, मी यापूर्वी नैराश्याची औषधं घेत होते. पण आता ती ही औषधं घेतं नसून ती ठीक आहे. त्यानंतर बॉसनं तिला ही माहिती लपवल्याचा आरोप लावला.
advertisement

पुढे ती म्हणाली की, बॉसने वॉशरुममध्ये जास्त वेळ घालवत असल्याचा आरोपही लावला. जेव्हा तिनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा बॉसनं म्हटलं की तू वादग्रस्त व्यक्ती आहे. या सर्व प्रकारानंतर तरुणीनं तीन दिवसांतच राजीनामा दिला. ही पोस्ट व्हायरल होताच लोकांच्या अनेक कमेंट येत आहेत. अनेकांसोबत अशा घटना घडत असतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2023 1:43 PM IST


