माणसाप्रमाणे खास शैलीत गाडी चालवतोय प्राणी, VIDEO पाहून व्हाल थक्क
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
माणूस सराईतपणे गाडी चालवतो. वेगवेगळ्या गाड्या, कार, हटके अंदाजात चालवताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल. मात्र कधी कोणत्या प्राण्यांना गाडी चालवताना पाहिलंय का?
नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : माणूस सराईतपणे गाडी चालवतो. वेगवेगळ्या गाड्या, कार, हटके अंदाजात चालवताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल. मात्र कधी कोणत्या प्राण्यांना गाडी चालवताना पाहिलंय का? ड्रायव्हिंग करताना प्राण्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ सध्या अनेकांचं मन जिंकत असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
काही प्राण्यांची बुद्धी एवढी तीक्ष्ण असते की ते मानवानं केलेली अवघड कामे सहज करू शकतात. आता ऑरंगुटान पाहा, माणसांप्रमाणेच गोल्फ कार्ट चालवत आहे. तेही अगदी आरामात. ऑरंगुटान प्राण्याचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ओरंगुटान गोल्फ कार्ट चालवताना दिसत आहे. त्याचे ड्रायव्हिंगचे कौशल्य पाहून तो प्राणी आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. गोल्फ कार्ट चालवण्याच्या ओरंगुटानच्या कौशल्याने प्रत्येकजण प्रभावित झाला आहे. हा व्हिडिओ दुबईचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
UAE चे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतौम यांची मुलगी, शेखा फातिमा रशीद अल मकतूमचे दुबईत प्राणीसंग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयात इतर प्राण्यांसोबत ओरंगुटानही ठेवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये दिसणार्या ओरंगुटानचे नाव रॅम्बो आहे. रॅम्बो गोल्फ कार्टसह विविध लहान वाहने चालविण्यात पटाईत आहे. रॅम्बो लहानपणापासूनच वेगवेगळी वाहने चालवत आहे. तसे, रॅम्बोचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे रॅम्बो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
advertisement
An orangutan driving a golf cart, checking the rear-view mirror, being cautious, and slowing down pic.twitter.com/hf8HoYHd5g
— Tansu YEĞEN (@TansuYegen) July 30, 2023
प्रत्येकजण रॅम्बोचं कौतुक करत आहे. @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1. 59 मिनिटांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2023 12:32 PM IST


