Fortunerची हवा टाइट करण्यासाठी येतेय MG Majestor! 12 फेब्रुवारीला होणार लॉन्च
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
एमजी मॅजेस्टर फूल-साइट SUV भारतात 12 फेब्रुवारी 2026 ला लॉन्च होणार आहे. ही टोयोटा फॉर्च्यूनर आणि स्कोडा कोडियाकला टक्कर देईल. दमदार लूक, प्रीमियम फीचर्स आणि 2.0-लीटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिनसह ही SUV 216 बीएचपीची पॉवर देते. याची किंमत जवळपास 40 ते 44 लाख रुपये असू शकते.
advertisement
advertisement
MG Majestor लूक : मॅजेस्टर ग्लोस्टरपेक्षा अधिक मस्क्युलर आणि स्पोर्टी दिसते. समोर, एसयूव्हीमध्ये ग्लॉस-ब्लॅक एलिमेंट्ससह पुन्हा डिझाइन केलेले ग्रिल, एलईडी डीआरएलसह व्हर्टिकल रुपात एलईडी हेडलॅम्प आणि काळ्या क्लॅडिंग आणि सिल्व्हर एलिमेंट्ससह एक नवीन बंपर आहे. बोनेट, फेंडर्स आणि दरवाज्यांवरील शीट मेटल ग्लोस्टरसारखेच आहे.
advertisement
advertisement
MG Majestor प्रीमियम फीचर्ससह येते : इंटीरयरच्या बाबतीत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. खरंतर एमजी मॅजेस्टरमद्ये अनेक प्रीमियम फीचर्स असण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये 12.3 इंचचा टचस्क्रीन इंफोटोनमेंट सिस्टम, पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरमिक सनरुफ, 12-स्पीकर साउंड सिस्टम, थ्री-झोन ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, वायरलेस फोन चार्जिंग, हीटेड पॅसेंजर सीट आणि पॉवर अॅडज्सटसह हीटेड, कूल्ड आणि मासिंग ट्रायव्हर सीटचा समावेश आहे.
advertisement
advertisement
MG Majestor ट्विन-टर्बो पॉवर : आगामी एमजी मॅजेस्टरमध्ये ग्लोस्टरचे 2.0-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन असेल, जे 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले असेल. हे सेटअप 216 बीएचपीची कमाल पॉवर आणि 479 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. ही एसयूव्ही ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) ऑप्शनसह देखील उपलब्ध असेल.









