Budh Rashifal: मित्र शनिच्या राशीत बुधाचा वावर! 4 राशींचे नशीब चमकण्याची वेळ आली, तिप्पट फायदा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Rashifal: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशीपरिवर्तन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह आज 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. तो 3 फेब्रुवारीच्या रात्री 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत याच राशीत राहील आणि त्यानंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी असून तो बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक मानला जातो. बुधाच्या या गोचरचा काही राशींवर चांगला परिणाम होणार आहे.
कर्क - या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग आहेत. बुध तुमच्या सातव्या स्थानी गोचर करणार आहे. यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. विशेषतः हस्तकलेच्या कामात असलेल्यांना फायदा होईल. जर एखादी कायदेशीर केस सुरू असेल, तर 3 फेब्रुवारीपर्यंत निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल.
advertisement
advertisement
मेष - बुध तुमच्या दहाव्या स्थानी गोचर करणार आहे. या स्थानाचा संबंध करिअर आणि वडिलांशी असतो. या काळात तुम्हाला कामात यश मिळेल आणि वडिलांचीही प्रगती होईल. नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होईल. मात्र, 3 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही गोष्टीचा लोभ धरणे टाळा आणि कुणाच्या मदतीचा चुकीचा फायदा घेऊ नका. 3 फेब्रुवारीपर्यंत बाहेरचे खाणे-पिणे टाळावे.
advertisement
advertisement
कन्या - बौद्धिक क्षमतेत वाढ होईल, बुध तुमच्या पाचव्या स्थानी गोचर करणार आहे. हे स्थान बुद्धी आणि संततीशी संबंधित आहे. यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल आणि अभ्यासात किंवा कामात गुरुंचे सहकार्य मिळेल. ज्यांना मुले आहेत, त्यांच्या मुलांची प्रगती होईल. आयुष्यात आनंदाचे आणि प्रेमाचे वातावरण राहील.
advertisement
तूळ - सुख-सोयींचे योग आहेत, बुध तुमच्या चौथ्या स्थानी गोचर करणार आहे. यामुळे तुम्हाला जमीन, घर आणि वाहन सुख मिळण्याची शक्यता आहे. हे गोचर तुमच्यासह इतरांसाठीही शुभ ठरेल. मात्र, या काळात आईच्या आरोग्याची आणि आर्थिक बाबींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









