लोकलची गर्दी कमी होणार! 'या' प्रवाशांनाच मिळणार दिलासा; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Last Updated:
New Railway Station : नालासोपारा येथील अलकापुरी परिसरात नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली आहे. या स्थानकामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
ठाणे : नालासोपारा आणि वसई-विरार परिसरातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या भागातून दररोज लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. मात्र वाढती लोकसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होत होती. आता ही समस्या लवकरत सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपारा येथील अलकापुरी परिसरात नव्या रेल्वे स्थानकाच्या उभारणीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या स्थानकामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकावरील ताण कमी होणार असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
गेल्या काही वर्षांत वसई-विरार परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले गेले आहेत. त्यामुळे या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. याचा थेट परिणाम वाहतूक आणि रेल्वे सेवांवर झाला आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवीन रेल्वे स्थानकाची योजना आखण्यात आली आहे.
advertisement
नवीन वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा सुरू होणार
याशिवाय राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या भागीदारीत वातानुकूलित आणि स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल ट्रेन सेवाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सुविधांसाठी द्वितीय श्रेणीच्या तिकिटांच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही. त्यामुळे सामान्य प्रवाशांनाही परवडणाऱ्या दरात आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 10:07 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
लोकलची गर्दी कमी होणार! 'या' प्रवाशांनाच मिळणार दिलासा; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा









