पुण्यात घरफोडी करून बेडरूममध्ये शिरले चोरटे, कपाटातील ती पिशवी उचकताच चमकले डोळे अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दिघे यांनी त्यांच्या बेडरूममधील कपाटाच्या वरच्या मोकळ्या जागेत एका पिशवी ठेवलेली होती. चोरट्यांनी ही पिशवी उघडून पाहिली अन्...
पुणे : पुणे शहरातील धनकवडी परिसरात भरवस्तीत घरफोडीची एक धाडसी घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममध्ये ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली चोरी: फिर्यादी संजय सदाशिव दिघे (वय ५५) हे धनकवडी येथील 'राजमुद्रा सोसायटी'मध्ये वास्तव्यास आहेत. १२ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. दिघे यांनी त्यांच्या बेडरूममधील कपाटाच्या वरच्या मोकळ्या जागेत एका पिशवीमध्ये एक लाख रुपयांची रोख रक्कम ठेवली होती. चोरट्यांनी कपाट उघडून पाहिलं असता त्यांना ही पिशवी सापडली. पिशवी उचकताच त्यातील पैसे पाहून चोरटे ती घेऊन पसार झाले.
advertisement
दिघे घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने सहकारनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी सुरू आहे. सोसायटीत सुरक्षा रक्षक असतानाही चोरट्यांनी घरात घुसून चोरी केल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
advertisement
निवडणुकीच्या काळात पोलीस गस्त वाढलेली असतानाही अशा घरफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या या भागातील सराईत गुन्हेगारांची चौकशी करत असून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 9:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात घरफोडी करून बेडरूममध्ये शिरले चोरटे, कपाटातील ती पिशवी उचकताच चमकले डोळे अन्...









