Raj Thackeray : काय चुकलं? काय कमी पडलं? मुंबईतील पराभवानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट, म्हणाले 'यश मिळालं नसल्याचं दु:ख मला...'

Last Updated:

Raj Thackeray Emotional Post : सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती, असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Emotional Post After loss Mumbai BMC Election
Raj Thackeray Emotional Post After loss Mumbai BMC Election
Raj Thackeray Post After BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल 25 वर्षानंतर उद्धव ठाकरेंना धक्का बसला अन् सत्ता गमावली आहे. भाजपने शिंदेसेनेला सोबत घेऊन महापालिकेवर भगवा फडकवला आहे. अशातच मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीत अपेक्षित असं यश मिळालं नाही. मनसेला फक्त 6 जागा निवडून आणता आल्या. मनसेचा स्ट्राईक रेट खूपच कमी राहिल्याने आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट करत पहिल्यांदाच वक्तव्य केलंय.

निवडणूक सोपी नव्हती...

सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी स्तुतीसुमने उधळली.
advertisement

खचून जाणाऱ्यातले आपण नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की, असं राज ठाकरे म्हणाले.
advertisement

काय चुकलं, काय राहून गेलं...

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
advertisement

लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया... - राज ठाकरे

तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया, असं राज ठाकरे म्हणाले.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Raj Thackeray : काय चुकलं? काय कमी पडलं? मुंबईतील पराभवानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट, म्हणाले 'यश मिळालं नसल्याचं दु:ख मला...'
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement