Pune : बाप तो बाप रहेगा...! पुण्यात गुलाल उधळताच मुरली अण्णांनी ठोकला शड्डू, 'कुणीबी या... किती बी या... '
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Murlidhar Mohol Viral Video : मुरली अण्णांनी गाडीवर चढून भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांचा एक डायलॉग व्हायरल होतोय. कुणी बी या... किती बी या... कसंही या! असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी 'बाप तो बाप रहेगा' गाण्य़ावर दंड थोपटले.
Pune PMC Election Result : पुणे महापालिका निवडणुकीत केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात भाजपने भगवा फ़डकवला. भाजपने पुण्यात एकहाती सत्ता खेचून आणली असून राष्ट्रवादी काँग्रेस पुण्याच भुईसपाट झाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता विजयानंतर मुरलीधर मोहोळ यांनी गुलाल उधळला अन् शड्डू देखील ठोकले. मुरली अण्णांनी गाडीवर चढून भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांचा एक डायलॉग व्हायरल होतोय. कुणी बी या... किती बी या... कसंही या! असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी 'बाप तो बाप रहेगा' गाण्य़ावर दंड थोपटले.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आम्हा सर्वांना विश्वास आहे. मी पुणेकरांना या विजयाचे श्रेय देईन की, त्यांनी विकासाला मत दिलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला. तसेच आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे रात्रंदिवस काम करत होते. आमच्याकडे जवळपास 2000 पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते, आम्ही 165 लोकांनाच संधी देऊ शकलो, असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
advertisement
पाहा Video
advertisement
'कमळ' हाच आमचा उमेदवार
ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. काही लोक गेले, पण जे राहिले, त्यांनी, 'कमळ' हाच आमचा उमेदवार या विचाराने त्यांनी जे काही काम केले, मला त्यांचा अभिमान वाटतो आणि हा विजय मी त्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.
advertisement
पुणेकरांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला
दरम्यान, शेवटी लोक हे विकासाला मत देतात. पुणेकर विकासाला आणि प्रगतीला मत देतात. पुण्याचं भविष्य आणि आमची पुढची पिढी कुठे सुरक्षित राहू शकते, याचा विचार पुणेकर जनता करते. म्हणून मला निश्चितपणे हा विश्वास होता, म्हणून पहिल्या दिवसापासून सांगत होतो की भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पुन्हा एकदा सत्तेत येईल, पुणेकरांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 12:00 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : बाप तो बाप रहेगा...! पुण्यात गुलाल उधळताच मुरली अण्णांनी ठोकला शड्डू, 'कुणीबी या... किती बी या... '










