मालेगावात सत्ता स्थापनेचा मोठा ट्विस्ट! इस्लामिक पार्टी की AIMIM? शिंदे सेना कुणासोबत जाणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Malegaon Election 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहीली. काल जाहीर झालेल्या निकालानुसार इस्लामिक पार्टीने ३५ जागा निवडून आणल्या आहेत.
मालेगाव : राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहीली. काल जाहीर झालेल्या निकालानुसार इस्लामिक पार्टीने ३५ जागा निवडून आणल्या आहेत. समाजवादी पक्षासोबत आघाडी करून त्यांनी मिळून ४० उमेदवार निवडून आले आहे. एमआयएमने २१ जागा निवडून आणत आपला जलवा दाखवला आहे. तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) यांनी १८ जागा निवडून आणल्या आहेत. काँग्रेसला फक्त ३ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपला फक्त २ जागांवर मजल मारता आली आहे.
इस्लामिक पार्टी आणि एमआयएमचा वाद
इस्लामिक पार्टी आणि एमआयएममध्ये मोठे मतभेद आहेत. आणि त्याचे पडसाद प्रचारामध्ये दिसून आले. एमआयएमचे प्रमुख ओवैसी यांनी इस्लामिक पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. त्याचा परिणाम आता सत्तास्थापनेवरही दिसून येणार आहे. सध्याचे चित्र पाहता एमआयएम आणि इस्लामिक पार्टी एकत्र सत्ता स्थापन करु शकत नाही. असं चित्र आहे.
advertisement
बहुमतासाठी फक्त ३ जागांची गरज
मालेगाव महापालिकेच्या एकूण ८४ जागांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये संपूर्ण बहुमत सिद्ध करण्यासाठी ४३ जागांची गरज आहे. सध्या इस्लामिक पार्टी आणि समाजवादी पक्षाचे मिळून ४० जागा निवडून आल्या आहेत. म्हणजेच बहुमतासाठी फक्त ३ जागांची गरज आहे.
शिंदे सेना सोबत जाणार?
मालेगावचा राजकीय इतिहास पाहता इस्लामिक पार्टीचे आसिफ शेख आणि शिवसेना नेते मंत्री दादा भुसे यांचा बालेकिल्ला म्हणून मालेगावची ओळख आहे. इस्लामिक पार्टीचे आसिफ शेख दादा भुसे हे चांगले मित्रही आहेत.
advertisement
२०१७ ची पुनरावृत्ती होणार?
२०१७ साली असिफ शेख हे काँग्रेसमध्ये असताना शिवसेनेसोबत युती करून सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी असिफ शेख यांच्या आईंना महापौरपद देण्यात आले होते तर शिवसेनेला उपमहापौरपद देण्यात आले होते. हीच शक्यता आता पुन्हा एकदा वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि इस्लामिक पार्टी दोघे मिळून सत्ता स्थापन करणार का? याकडे सगळ्यांचे लक्षं लागलेले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Malegaon,Nashik,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 11:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मालेगावात सत्ता स्थापनेचा मोठा ट्विस्ट! इस्लामिक पार्टी की AIMIM? शिंदे सेना कुणासोबत जाणार?








