दहावी पास बेरोजगार तरुणांना पोस्ट विभाग देणार रोजगाराची संधी! फक्त 'या' 3 अटी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
भारतीय टपाल विभागाने (India Post) आपल्या सेवांचा विस्तार करण्यासाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी 'फ्रँचायझी योजना' सुरू केली आहे.
पुणे : भारतीय टपाल विभागाने (India Post) आपल्या सेवांचा विस्तार करण्यासाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी 'फ्रँचायझी योजना' सुरू केली आहे. ज्या शहरी किंवा ग्रामीण भागात अद्याप पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही, अशा ठिकाणी ही केंद्रे सुरू करून टपाल सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवली जाणार आहे.
योजनेचे स्वरूप आणि सेवा: या फ्रँचायझी केंद्रांवरून नागरिकांना पत्रांचे बुकिंग व वितरण, स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, आणि पार्सल सेवा मिळतील. याशिवाय पोस्टाची बचत खाती, मासिक उत्पन्न योजना (MIS), विमा योजना, आणि विविध बिलांचा भरणा अशा सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, फ्रँचायझीधारकांना निश्चित पगार नसून प्रत्येक व्यवहारावर आकर्षक कमिशन किंवा मानधन दिले जाईल.
advertisement
पात्रता आणि अटी:
शिक्षण: उमेदवार किमान १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असावा.
नागरिकत्व: उमेदवार भारतीय नागरिक आणि स्थानिक रहिवासी असणे आवश्यक.
जागा आणि साधने: उमेदवाराकडे स्वतःच्या मालकीची किमान ५० चौरस मीटर जागा असावी. तसेच संगणक, इंटरनेट, प्रिंटर, वजनकाटा, बारकोड स्कॅनर आणि स्मार्टफोन ही साधने असणे अनिवार्य आहे.
निवड प्रक्रिया: सुरुवातीला निवडलेल्या उमेदवारांशी एक वर्षाचा करार केला जाईल. जर त्यांची कामगिरी समाधानकारक राहिली, तरच या कराराचे नूतनीकरण करण्यात येईल. अन्यथा फ्रँचायझी रद्द करण्याचे अधिकार पोस्ट विभागाकडे असतील. "जिथे पोस्ट ऑफिस नाही, तिथे या माध्यमातून मोजक्या पण महत्त्वाच्या सेवा दिल्या जातील," असे जनसंपर्क अधिकारी नितीन बने यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 11:52 AM IST










