विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! बीपीएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला आजपासून सुरुवात; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख?
Last Updated:
B.P.Ed CET 2026 Registration : बीपीएड सीईटी 2026 साठीची नोंदणी प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू झाली आहे.
मुंबई : बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन अर्थात बीपीएड या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बीपीएड सीईटी 2026 साठीची नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली आहे. मात्र कधी पर्यंत ही नोंदणी विद्यार्थ्यांना करता येणार आहे याबाबतची अपडेट जाणून घ्या
बीपीएड सीईटी नोंदणीला सुरुवात
बीपीएड अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. यामध्ये प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार असून ती 4 एप्रिल 2026 रोजी होईल. त्यानंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी 5 ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत मैदानी म्हणजेच फिल्ड चाचणी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
कधी पर्यंत करता येणार अर्ज?
नोंदणी प्रक्रिया गुरुवार 16 जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून इच्छुक उमेदवारांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे.
advertisement
ही परीक्षा राज्यातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता अटी, अर्ज भरण्याची प्रक्रिया, शुल्क, वेळापत्रक तसेच इतर महत्त्वाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
बीपीएड अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. उशीर झाल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक माहिती तपासून तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 12:01 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! बीपीएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला आजपासून सुरुवात; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख?








