निवडणूक हरताच अजित पवारांचा मोठा डाव, पराभवाचा वचपा काढणार, दुसऱ्याच दिवशी घेतला निर्णय
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
महापालिका निवडणुकीत अजित पवारांचा दारुण पराभव झाला. पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी ते कामाला लागले असून त्यांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा सुफडा साफ झाला आहे. कोणत्याच महानगर पालिकेत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळाली नाही. अजित पवार यांनी पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण ताकद लावली होती. ते अनेक दिवस इथं ठाण मांडून बसले होते. इथं त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत देखील युती केली होती. पण त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही. महापालिका निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार कामाला लागले असून त्यांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
आज सकाळी अजित पवार यांनी बारामतीतील गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. महापालिका निवडणूक निकालानंतर अजित पवार तडकाफडकी काकांना भेटायला का गेले? यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती समोर आली आहे.
advertisement
या बैठकीबद्दल माहिती देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार आहे. महानगर पालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाचं आत्मचिंतन करू आणि पुढे जाऊ असंही शशिकांत शिंदे म्हणाले.
या भेटीनंतर आता अजित पवार देखील पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी बारा वाजता अजित पवार आपली भूमिका मांडणार आहेत. महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी बराच वेळ गेला. त्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नाही, याचा फटका कुठेतरी निवडणुकीत बसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी सावध भूमिका घेत. लगेच कामाला लागले आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 12:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणूक हरताच अजित पवारांचा मोठा डाव, पराभवाचा वचपा काढणार, दुसऱ्याच दिवशी घेतला निर्णय








