Shocking News : वेटरने रुमचा दरवाजा उघडला अन् समोरचं दृश्य पाहून त्याची वाचाच बसली; मालाडमधील भयानक कांड
Last Updated:
Malad Crime Case : मालाडमधील मढ परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये परदेशी पर्यटक जखमी अवस्थेत आढळून आला. स्वतःवर चाकूने वार केल्याचा संशय असून पोलिसांनी सीसीटीव्ही तपासासह सखोल चौकशी सुरू केली आहे.
मुंबई : मालाडमधील मढ परिसरात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. या परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या एका परदेशी पर्यटकाने स्वतःवर चाकूने वार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
परदेशी पर्यटकाचे टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास संबंधित पर्यटक ज्या खोलीत राहत होता, त्या खोलीत मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळून आले. ही बाब लक्षात येताच हॉटेल प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमी पर्यटकाला उपचारासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्या पर्यटकाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप समजले नाही.
advertisement
हा प्रकार आत्महत्येचा प्रयत्न आहे की त्यामागे काही वेगळे आणि गंभीर कारण आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि कडक नियंत्रण असलेल्या अशा नामांकित हॉटेलमध्ये अशी घटना घडणे संशयास्पद मानले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित परदेशी पर्यटकाची संपूर्ण माहिती, तो भारतात कधी आणि कशासाठी आला होता तसेच हॉटेलमध्ये त्याच्या हालचाली कशा होत्या याचा तपास केला जात आहे. याशिवाय हॉटेलमधील कर्मचारी यांच्याकडून सर्व माहिती घेतली आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच घटनेमागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 12:44 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking News : वेटरने रुमचा दरवाजा उघडला अन् समोरचं दृश्य पाहून त्याची वाचाच बसली; मालाडमधील भयानक कांड









