लग्नाच्या पहिल्याच रात्री तरुण झाला फरार, वधूला बसला धक्का, नेमकं असं काय घडलं?

Last Updated:

असे सांगितले जात आहे की, लग्नाच्या पहिल्याच रात्री तो आपल्या पत्नीला म्हणजे नवविवाहित तरुणीला सोडून घरातून फरार झाला. यानंतर जेव्हा तरुणी झोपेतून उठली तेव्हा तिला तिचा पती दिसला नाही.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
ऋतु राज, प्रतिनिधी
मुजफ्फरपुर : लग्नानंतर नववधू आणि वर हे हनीमूनला जातात. मात्र, एका दाम्पत्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाची पहिली रात्री एक तरुण आपल्या पत्नीला सोडून गुपचूप फरार झाला. यानंतर तरुणीला मोठा धक्का बसला.
नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण -
मुजफ्फरपुर जिल्ह्यातील एक तरुण आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवविवाहित वधूला सोडून फरार झाला. दोन दिवस तो मोबाईल स्विच ऑफ करुन पाटणा आणि दानापूर येथे फिरत राहिला. यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचे लोकेशन पोलिसांना मिळाले. यानंतर त्याला आरा स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले. बँक कर्मचारी असलेला या तरुणाला सध्या पोलीस कोठडीत टाकण्यात आले आहे. तर दुसरीकडे आपला पती सापडल्याने वधूच्या जीवात जीव आला आहे.
advertisement
ही घटना मुजफ्फरपुर जिल्ह्यातील अहियापुर पोलीस ठाणे हद्दीतील शाहबाजपुर येथील आहे. शाहबाजपुर येथील आदित्य विश्वजीत शाही हा भागलपुर येथील स्टेट बँकेतील एका शाखेत कार्यरत आहे. त्याचे लग्न बोचहां पोलीस ठाणे हद्दीतील एका मुलीसोबत ठरले होते. 31 जानेवारीला फळदानसह तिलकोत्सव झाला. याच दिवशी प्रीति भोजही होते. कार्यक्रम उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी बँक कर्मचारी आदित्य शाही याने आपल्या लग्नाची वरात बोचहान येथे आणली. यानंतर लग्न झाले आणि वधूला तो आपल्यासह घेऊन गेला.
advertisement
गरिबांना जेवण मिळावं म्हणून भारतीय तरुणी बजावतेय महत्त्वाची भूमिका, नेमकं ती काय करतेय, जाणून घ्या?
असे सांगितले जात आहे की, लग्नाच्या पहिल्याच रात्री तो आपल्या पत्नीला म्हणजे नवविवाहित तरुणीला सोडून घरातून फरार झाला. यानंतर जेव्हा तरुणी झोपेतून उठली तेव्हा तिला तिचा पती दिसला नाही. त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. यानंतर नववधूला मोठा धक्का बसला. कुटुबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली.
advertisement
याबाबत माहिती देताना सहायक पोलीस अधीक्षक भानु प्रताप सिंह यांनी सांगितले की, तक्रार दाखल झाल्यावर 36 तासाच्या आत वराला ताब्यात घेण्यात आले. सध्या तो या घटनेबाबत काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नाही. पण त्याने इतके सांगितले की, तो आपल्या घरातून गुपचूप गायब झाला. यानंतर त्याने एटीएममधून 50 हजार रुपये काढले आणि बॅरिया बस स्टँड येथून बसने पाटण्याला गेला. तिथून तो रेल्वेने दानापूर येथे गेला. तिथे एक रात्रभर थांबला.
advertisement
यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने पाटणा येथे आला. तेथून ते आरा येथे जात होता. या दरम्यान त्याने आपला मोबाईल स्विचऑफ केला होता. पण रेल्वेत बसल्यावर त्याने ज्यावेळी आपला मोबाईल स्विच ऑन केला. तेव्हा त्याची ट्रॅकिंग सुरू झाली. यानंतर त्याला मुजफ्फरपुर पोलिसांनी आरा स्टेशन येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/Viral/
लग्नाच्या पहिल्याच रात्री तरुण झाला फरार, वधूला बसला धक्का, नेमकं असं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement