गरिबांना जेवण मिळावं म्हणून भारतीय तरुणी बजावतेय महत्त्वाची भूमिका, नेमकं ती काय करतेय, जाणून घ्या?

Last Updated:

अस्मिता केरकर असे या भारतीय तरुणीचे नाव आहे. अस्मिता हिचा जन्म भारतातील कर्नाटक या राज्यातील बेळगाव येथे झाला.

भारतीय तरुणी अस्मिता
भारतीय तरुणी अस्मिता
बेळगाव (कर्नाटक) : प्रत्येकाला आपली वाढ चांगली व्हावी, यासाठी पोषक आहाराची गरज असते. पण आजही असे काही लोकं आहेत, ज्यांना दोन वेळचं अन्नही मिळत नाही. तर काहींना स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाही करणे कठीण होते. अमेरिकेचा विचार केला असता अंदाजे 49 दशलक्ष लोक, म्हणजे सहा लोकांपैकी एक जण असा, जो अजूनही अन्न सहाय्यावर अवलंबून आहेत.
भारतीय तरुणी करतेय हे कार्य -
मात्र, दुसऱ्या बाजूला विचार केला असता, अन्न स्रोत विकसित झाले आहेत. समाजातील लोकांच्या गरजा आणि लोकसंख्याही वाढत आहे. त्यातच देणगीदार आणि स्वयंसेवक समर्थनासाठी अधिक स्पर्धा होत आहे. यासाठी FFEN - फाउंडेशन फॉर इसेन्शिअल नीड्स हे या नवीन, सतत बदलणार्‍या वातावरणाशी जुळवून घेण्‍यासाठी फूड शेल्फ्‍सला मदत करण्‍यासाठी एक सतत संसाधन आणि भागीदार म्हणून कार्य करते आहे. त्यांचे ध्येय अमेरिकेतील मिनेसोटा राज्यात सर्व खरेदीदारांना निरोगी अन्न उपलब्ध करुन देणारी व्यवस्था उभी करणे असे आहे. या संस्थेच्या माध्यातून तेथील गरजूंना अन्नपुरवठा केला जातो. याच संस्थेत एक भारतीय तरुणी महत्त्वाची कामगिरी करत आहे.
advertisement
कोण आहे ही भारतीय तरुणी -
अस्मिता केरकर असे या भारतीय तरुणीचे नाव आहे. अस्मिता हिचा जन्म भारतातील कर्नाटक या राज्यातील बेळगाव येथे झाला. ती सध्या FFEN या संस्थेसोबत त्या Spatial Experience Designer/Design Strategist म्हणून कार्यरत आहे. अस्मिता हिने केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून बी. आर्क. मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने अमेरिकेतील पासाडेना, कॅलिफोर्निया, येथील आर्टसेंटर कॉलेज ऑफ डिझाईनमध्ये पर्यावरणीय डिझाइन या विषयात एमएससीचे शिक्षण घेतले.
advertisement
याबाबत न्यूज18 लोकल च्या टीमशी बोलताना तिने सांगितले की, मी फूड शेल्फ लीडर्सच्या बरोबरीने स्पेस लेआउट्स डिझाइन करण्यासाठी काम करते. हे काम अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील खरेदीदारांच्या संख्येत वाढ करणार्‍या जागा डिझाइन करताना स्थानिक फूड शेल्फ्सची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवतात. FFEN मध्ये मी सुमारे 4 ते 5 फूड शेल्फ् ज्यांनी DHS अनुदानासाठी अर्ज केला, जे फूड शेल्फचे पुनर्डिझाईन, नूतनीकरण आणि अनुकूलतेने जागा पुनर्वापर करण्यात मदत केली आहे तसेच फूड शेल्फ् 'चे लेआउट डिझाइन करण्यात मदत केली आहे.
advertisement
या रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) मध्ये समाविष्ट असलेले सर्व निधी स्पर्धात्मक पुनरावलोकन प्रक्रियेद्वारे वितरित केले जातील. या रिक्वेस्ट फॉर प्रपोजल अंतर्गत सुमारे सात दशलक्ष डॉलर्स अनुदान उपलब्ध असल्याचा अंदाज राज्याचा आहे. राज्यव्यापी आधारावर संभाव्य प्रकल्प आणि पात्र अर्जदारांना ओळखण्यासाठी स्पर्धात्मक पुनरावलोकन प्रक्रियेद्वारे अनुदान निश्चित केले जाते.
advertisement
करोडपती झाल्यावर विश्वास बसेना, अनेकदा केलं कन्फर्म, पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या व्यक्तीसोबत काय घडलं?
मी फ्रेश फूड फर्स्ट - फूड रेस्क्यू टूलकिट देखील डिझाइन करत आहे, ज्याचा वापर फूड शेल्फ लीडर्स, फूड बँक्स आणि इतर भागीदार यांच्या सोबत सह-डिझाइन केलेल्या विकसित करण्यासाठी आवश्यक टूलकिट निर्धारित करण्यासाठी केला जाईल. या प्रकल्पाला मिनेसोटा प्रदूषण नियंत्रण एजन्सी (MPCA) कडून "वाया जाणारे अन्न आणि अन्न बचाव प्रतिबंधक" अनुदानाद्वारे अर्थसहाय्य आणि समर्थन दिले जाते. माझे काम फूड शेल्फ्चे जास्तीत जास्त ताजे पदार्थ, विशेषत: अन्न बचाव आणि ग्राहकांना अन्न मिळाल्यापासून ते वितरणापर्यंत अन्न कचरा कमी करण्यात मदत करण्यावर केंद्रित असेल.
advertisement
हे "फ्रेश फूड फर्स्ट" - फूड रेस्क्यू टूलकिटसह हवामान बदलाशीसुद्धा सक्षम असू शकतात, अशा पद्धतीने याची रचना तयार केली जाते. लोकांसाठी डिझाइन करण्याऐवजी लोकांसोबत डिझाइन करणे ही माझी आवड आहे आणि सक्रियपणे लोकांची सेवा करण्यास सक्षम असणे मला प्रेरित करते आणि मला विश्वास आहे की एकत्रितपणे, आपण एका वेळी एक चांगले जग तयार करू शकतो, असेही ती न्यूज18 लोकल सोबत बोलताना म्हणाली. यानंतर असे अनेक फूड शेल्फ राज्यात तयार करण्याचा प्रयत्न असेल.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
गरिबांना जेवण मिळावं म्हणून भारतीय तरुणी बजावतेय महत्त्वाची भूमिका, नेमकं ती काय करतेय, जाणून घ्या?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement