सोशल मीडियावर गाजलं झुरळाचं पेन्टिंग, याची किंमत आणि Video पाहाल तर म्हणाल, 'अरे हे असं आहे का?'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका रीलमध्ये दाखवण्यात आलं की, एका आर्टिस्टने पांढऱ्या बोर्डावर झुरळ सोडलं. झुरळ जसं जसं चालत गेलं, त्याच्या हालचालींचे ट्रॅक घेऊन आर्टिस्टने ब्रश फिरवला.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात कलेची परिभाषाच बदलत चालली आहे. पूर्वी कलेचा अर्थ म्हणजे चित्रकाराची मेहनत, ब्रशची नजाकत किंवा रंगांची जादू असायची. पण आता सोशल मीडिया आणि व्हायरल व्हिडिओंच्या दुनियेत कलेची व्याख्या वेगळ्या पातळीवर पोहोचली आहे. कधी एआयच्या मदतीने तयार झालेली कलाकृती लोकांना भुरळ घालते, तर कधी एखाद्या अजब प्रयोगातून तयार झालेले चित्र चर्चेत येते.
असं काहीतरी वेगळं उदाहरण अलीकडे समोर आलं आहे. एका झुरळाने तयार केलेली ‘मास्टरपीस’ पेंटिंग, ज्याची किंमत तब्बल शे-दोनशे किंवा हजार नाही तर 1 मिलियन डॉलर्स (सुमारे 8.4 कोटी रुपये) लावली गेली आहे.
हो हे थोडं आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. पण हे खरं आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका रीलमध्ये दाखवण्यात आलं की, एका आर्टिस्टने पांढऱ्या बोर्डावर झुरळ सोडलं. झुरळ जसं जसं चालत गेलं, त्याच्या हालचालींचे ट्रॅक घेऊन आर्टिस्टने ब्रश फिरवला. त्या रँडम हालचालींचं रूपांतर एका जटिल, वळणदार आणि एब्सट्रॅक्ट पेंटिंगमध्ये झालं.
advertisement
व्हिडिओच्या शेवटी आर्टिस्टने बोर्ड कॅमेऱ्याकडे फिरवलं आणि त्यावर मोठ्या अक्षरांत $1M चा प्राइस टॅग झळकला. फक्त 48 तासांत या रीलला 5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.
advertisement
व्हिडिओ पाहून अनेकांना आधी काहीच कळलं नाही, पण शेवटी तयार झालेलं चित्र पाहून लोक थक्क झाले. कमेंट सेक्शनमध्ये तर चर्चा रंगली. कुणी म्हणालं, “हे तर AI जनरेटेड वाटतंय, पण क्रिएटिव्ह आहे!” तर दुसऱ्याने विनोद केला, “8 कोटी? मी तर 800 रुपयांत विकत घेईन.”
अशी अजबोगरीब पेंटिंग्ज करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आर्ट हिस्ट्रीमध्ये ‘चांस आर्ट’ किंवा ‘ॲक्शन पेंटिंग’ या प्रकारांना मान्यता मिळाली आहे, जिथे रँडमिटीच कला बनते. 1950च्या दशकात प्रसिद्ध आर्टिस्ट जॅक्सन पोलक यांची ड्रिप पेंटिंग्स केली होती. पण झुरळाच्या मदतीने तयार झालेलं पेंटिंग हे खरंच अनोखं प्रयोग आहे.
advertisement
कलेची किंमत मोजताना लोक थक्क होतात आणि हे झुरळाचं पेंटिंगही त्याच मालिकेतील नवं, चर्चेतलं उदाहरण ठरलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 7:45 PM IST
मराठी बातम्या/Viral/
सोशल मीडियावर गाजलं झुरळाचं पेन्टिंग, याची किंमत आणि Video पाहाल तर म्हणाल, 'अरे हे असं आहे का?'