advertisement

Gold In Soil: मातीतून सोनं काढतात भारतातील या गावातले लोक; दरवर्षी करतात लाखोंची कमाई

Last Updated:

आज आम्ही अशा गावाविषयी सांगणार आहोत, जिथे लोक मातीतून सोनं काढतात. हे गाव परदेशात नसून भारतातच आहे.

मातीतून सोनं काढतात लोक
मातीतून सोनं काढतात लोक
नवी दिल्ली 08 डिसेंबर : सोनं खाणीतून काढलं जातं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. लहान तुकडे किंवा धान्याच्या छोट्या दाण्यांच्या स्वरूपात ते वाहत्या पाण्यातून गोळा केलेल्या मातीमध्ये आढळतं. जगात अनेक खाणी आहेत, जिथे एक्‍सपर्ट लोक काम करतात. यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. पण आज आम्ही अशा गावाविषयी सांगणार आहोत, जिथे लोक मातीतून सोनं काढतात. हे गाव परदेशात नसून भारतातच आहे. त्यांची कहाणी जाणून घेऊया.
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्रीकलाहस्ती क्षेत्राजवळील गावांमध्ये मातीतून सोनं काढलं जातं. हे लोक अनेक पिढ्यांपासून हे काम करत आहेत. खरं तर, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक प्रसिद्ध दुकानं आहेत, जिथे सोन्याचे दागिने बनवले जातात. दागिने बनवताना त्यातून धूळ, माती आणि इतर अनेक गोष्टी बाहेर टाकल्या जातात. हे लोक या निरुपयोगी वस्तू खरेदी करतात. त्यानंतर त्याच्यातून सोनं काढण्याचं काम सुरू होतं.
advertisement
पाराच्या मदतीने ते चिकणमातीचं सोन्यात रूपांतर करतात, असं गावकरी सांगतात. पण संपूर्ण प्रक्रिया काय आहे? आधी चिकणमातीच्या मातीत पारा मिसळला जातो आणि त्याचे छोटे गोळे बनवून 2-3 दिवस कोरडे होण्यासाठी ठेवले जातात. मग ते केकसारखे बनवले जातात, गरम केले जातात आणि मशीनमध्ये ठेवले जातात. तिथे ही केकसारखी माती आणखी एक दिवस वाळवून थंड केली जाते. यातील सोनं आणि पारा वेगळं करण्याचे काम 2 महिला करतात.
advertisement
कचऱ्यातून मिळणारं सोनं काचेच्या भांड्यात टाकलं जातं आणि नंतर ते भट्टीत भाजलं जातं. नंतर त्यात एक अॅसिड घालून गरम केलं जातं. या प्रक्रियेत तांबे-पितळ आणि इतर अशुद्धी अॅसिडमध्ये विरघळतात, त्यानंतर शुद्ध सोनं बाहेर येतं. मात्र, यातही नशिबाचा खेळ आहे. कारण अनेकदा जेवढा पारा मिसळला तेवढं सोनं मिळत नाही. कधी 1 ग्रॅम तर कधी 2 ग्रॅम मिळतात. अनेक वेळा हे देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत माती खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च खूपच जास्त आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Gold In Soil: मातीतून सोनं काढतात भारतातील या गावातले लोक; दरवर्षी करतात लाखोंची कमाई
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement