advertisement

Weird Habit : विचित्र व्यसन! दररोज बेबी पावडर खाते ही महिला; यासाठी महिनाभरात खर्च करते लाखो रूपये

Last Updated:

या 27 वर्षीय महिलेनं खुलासा केला की तिला रोज जॉन्सन बेबी पावडर खायला आवडते. ती थोडीफार नाही तर पावडरचा संपूर्ण डबा खाते.

बेबी पावडर
बेबी पावडर
मुंबई 08 डिसेंबर : तुम्ही अनेक लोकांच्या विचित्र छंदांबद्दल ऐकलं असेलच. पण एका अमेरिकन महिलेचा छंद अतिशय विचित्र आणि अजब आहे. या 27 वर्षीय महिलेनं खुलासा केला की तिला रोज जॉन्सन बेबी पावडर खायला आवडते. ती थोडीफार नाही तर पावडरचा संपूर्ण डबा खाते. यावर्षी तिने फक्त बेबी पावडर खाण्यासाठी 4000 डॉलर म्हणजेच 3.33 लाख रुपये खर्च केले आहेत.
मिररच्या रिपोर्टनुसार, लुइसियानाच्या न्यू ऑरलियन्स येथे राहणाऱ्या ड्रेका मार्टिनने सांगितलं की, आपल्या मुलांना आंघोळ घातल्यानंतर ती नेहमी ही पावडर चाखण्याची मजा घ्यायची. पण नंतर तिला याची सवय झाली. मार्टिनने सांगितलं, की ती दररोज जॉन्सन्स एलो आणि व्हिटॅमिन ई पावडरची 623 ग्रॅम बाटली घेते. ती इतर जेवण सोडू शकते, परंतु ती हे सोडत नाही. तिला ते आवडतं कारण ते तोंडात वितळतं.
advertisement
मार्टिनने सांगितलं की, गर्भधारणेदरम्यान ती ड्रग्जपासून दूर राहिली. पण आता ती व्यसनाधीन झाली आहे. इतकी पावडर खाऊनही तिची तब्येत कधीच बिघडली नाही, असा तिचा दावा आहे. जानेवारीपासून ती दररोज पावडरच्या बाटलीवर $14 खर्च करते. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनने प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमची बेबी पावडर फक्त त्वचेवर वापरण्यासाठी बनवली जाते. ते न खाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ते कोणीही खाऊ नये. पण मार्टिन म्हणते, की मला ती आवडते आणि आता फक्त काळजी अशी आहे की तिच्या मुलांनाही ही सवय लागू शकते. कारण तिला पावडर खाताना पाहून मुलगाही ते मागतो.
advertisement
मार्टिनने द मिररला सांगितलं की, 'मला बेबी पावडर खायला आवडते. त्याचा जसा वास येतो तशीच त्याची चवही असते. हे मला चांगलं वाटतं. मला माहित आहे की हे एक व्यसन आहे. मी ते टाळण्याचाही प्रयत्न करते, पण स्वतःला थांबवू शकत नाही. जेव्हा मी बेबी पावडरचा विचार करते तेव्हा माझ्या तोंडाला पाणी सुटतं. जर मला चांगलं अन्न आणि बेबी पावडर यापैकी एक पर्याय दिला असेल तर मी बेबी पावडर निवडेन. मी यावर माझा शेवटचा डॉलरही खर्च करेन कारण मला त्याची खूप गरज आहे.' मार्टिन म्हणाली, मी हे माझ्या आईपासून महिनाभर लपवून ठेवलं, पण एके दिवशी तिने विचारलं की बेबी पावडर इतक्या वेगाने का संपत आहे. सहसा आमच्याकडे असलेली बाटली 2 महिने टिकते. मात्र आता ती आठवडाभरात संपत आहे.'
view comments
मराठी बातम्या/Viral/
Weird Habit : विचित्र व्यसन! दररोज बेबी पावडर खाते ही महिला; यासाठी महिनाभरात खर्च करते लाखो रूपये
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement