अरे बापरे बाप! काय आहे हे? पोट दुखतंय म्हणून आला, ऑपरेशननंतर डॉक्टरही धक्क्यात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Spoon toothbrush pen inside stomach : एक 40 वर्षांची व्यक्ती, बऱ्याच दिवसापासून तिच्या पोटात दुखत होतं. ती डॉक्टरांकडे गेली. तिच्या पोटात असं काही दिसलं की डॉक्टरांनाही धक्का बसला.
लखनऊ : पोटात वेदना होण्याची अनेक कारणं आहेत. सुरुवातीला सामान्य समजून अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. घरीच काहीतरी उपाय केले जातात. पण वेदना कमी होण्याऐवजी वाढतच गेल्या किंवा बऱ्याच दिवस तशाच राहिल्या की डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. अशीच एक 40 वर्षांची व्यक्ती, बऱ्याच दिवसापासून तिच्या पोटात दुखत होतं. ती डॉक्टरांकडे गेली. तिच्या पोटात असं काही दिसलं की डॉक्टरांनाही धक्का बसला.
उत्तर प्रदेशच्या हापूरमधील हे प्रकरण आहे. बुलंद शहरात राहणारा 40 वर्षांचा सचिन. ज्याच्या पोटात दुखत होतं म्हणून त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे रिपोर्ट काढला आणि त्यांना त्याच्या पोटात काहीतरी विचित्र दिसून आलं. त्यांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशननंतर त्याच्या पोटातून जे बाहेर पडलं ते पाहून डॉक्टरही हैराण झाले.
advertisement
ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांनी सचिनच्या पोटातून एकूण 49 वस्तू काढल्या. ज्यात 28 स्टीलचे चमचे, 19 टूथब्रश आणि 2 पेन यांचा समावेश होता. डॉ. श्याम कुमार यांनी स्पष्ट केलं की मानसिक समस्या असलेल्या लोकांमध्ये असे प्रकार सामान्यतः दिसून येतात.
advertisement

सचिनला ड्रग्जचं व्यसन होतं. त्याच्या कुटुंबाने त्याला गाझियाबादमधील ड्रग्ज डिअॅडिक्शन सेंटरमध्ये दाखल केलं. पण तिथं अन्नाचा अभाव आणि ताण यामुळे सचिन रागराग करू लागला. हळूहळू तो स्टीलचे चमचे, टूथब्रश आणि पेन गिळू लागला. ही सवय अनेक दिवस चालू राहिल्यानंतर त्याला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याला हापूरच्या देवनंदिनी रुग्णालयात नेण्यात आलं. शस्त्रक्रियेनंतर सचिनची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Location :
Delhi
First Published :
September 26, 2025 11:10 AM IST