29 चमचे आणि 19 टूथब्रश गिळूनही तो जिवंत? हे कसं शक्य? X-ray पाहाताच डॉक्टरही हादरले
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपण एखादं हेवी फूड खाल्लं तर ते देखील आपल्या पोटाला पचवता येत नाही. अशाने उलट्या, पोटदुखी, किंवा इतर त्रास होऊ शकतो. पण उत्तर प्रदेशातील हापुड़मध्ये घडलेला एक प्रकरण इतका विचित्र आणि गंभीर आहे की ते ऐकून वैद्यकीय शास्त्रही आश्चर्यचकित झाले आहे.
मुंबई : आपण जेवतो किंवा एखादी गोष्ट खातो ती आपलं पोट भरते आणि उर्जा देते, ज्यामुळे आपण दिवसभरातील कामं करु शकतो. पण आपण जेवताना किंवा खाताना अशाच गोष्टी खातो, ज्या आपल्याला पचतील किंवा आपलं पोट त्याला पचवू शकेल. यात कधी कधी चुकून एखादी छोटी गोष्टी, जसे की बटण किंवा एखादा केस जरी तोंडात गेला तरी आपल्याला ते पचवता येत नाही. कधीकधी तर आपण एखादं हेवी फूड खाल्लं तर ते देखील आपल्या पोटाला पचवता येत नाही. अशाने उलट्या, पोटदुखी, किंवा इतर त्रास होऊ शकतो. पण उत्तर प्रदेशातील हापुड़मध्ये घडलेला एक प्रकरण इतका विचित्र आणि गंभीर आहे की ते ऐकून वैद्यकीय शास्त्रही आश्चर्यचकित झाले आहे.
काय घडलं?
बुलंदशहरचा 40 वर्षीय सचिन नशेचा आदी होता. त्याच्या घरच्यांनी त्याला नशा मुक्तीसाठी गाजियाबादमधील एका रिहॅब सेंटरमध्ये दाखल केले. एका महिन्याच्या काळात, रागाच्या भरात सचिनने 29 स्टीलचे चमचे, 29 टूथब्रश आणि 2 पेन गिळले. काही दिवसांनी त्याला तीव्र पोटदुखी आणि कमजोरी जाणवू लागली. त्यावेळी अल्ट्रासाउंड करताच डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांना एक्सरेमध्ये त्याच्या पोटात चमचे आणि ब्रशच दिसत होते.
advertisement
डॉ. श्याम कुमार आणि त्यांच्या टीमने तब्बल 4 तासांची ओपन सर्जरी करून हे सर्व पोटातून बाहेर काढले. सर्जरी नंतर सचिन आता सुरक्षित आहे. पण हे प्रकरण वैद्यकीय दृष्टिकोनातून गूढ ठरलं आहे.
सचिननं हे का केलं?
सचिनने सांगितले की हा सगळा प्रकार त्याच्या रागामुळे घडला, म्हणजेच त्याने हे मुद्दाम केलं नव्हतं, तर त्याला ड्राग्स मिळत नव्हते या रागाने त्याने केलं. डॉक्टरांच्या मते, काही लोक मानसिक ताण-तणाव, राग किंवा डिसऑर्डरमुळे अशा कृती करतात, ज्याला ‘पिका डिसऑर्डर’ किंवा ‘इंपल्सिव कंट्रोल डिसऑर्डर’ म्हणतात. अशा परिस्थितीत व्यक्ती स्वतःला होणाऱ्या धोक्याची जाणीव न करता असामान्य गोष्टी खाऊ शकतो.
advertisement
पोटात इतक्या वस्तू कशा राहिल्या?
मानव पोट हा J-आकाराचा अंग आहे, जो सुमारे 1–1.5 लिटर क्षमता धरू शकतो. जेव्हा आपण अन्न खाऊन पाठवतो, ते पोटात ‘पेरिस्टाल्सिस’ नावाच्या मांसपेशी हलचालींनी जातो. जर कोणीतरी हळूहळू जास्त प्रमाणात वस्तू घेतल्या, तर पोट हळूहळू त्या वस्तूंना जास्त जागा देण्यासाठी फैलू शकते. सचिनच्या प्रकरणात चमचे आणि ब्रश पोटात जमा झाले होते, पण काहीही पचत नव्हते. जर हे वस्तू आतड्यात गेल्या असत्या, तर आतडे कापली गेली असती किंवा ब्लॉकेज होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता.
advertisement
किती धोकादायक आहे?
फक्त एका चमच्यानेही पोट किंवा आतड्यांना गंभीर जखम होऊ शकते. स्टील किंवा प्लास्टिकच्या वस्तू पोटाच्या किंवा आतड्यांच्या भिंतींना फाडू शकतात, ज्यामुळे रक्तस्त्राव, संक्रमण, उलट्या, पोटफुलणे आणि गंभीर परिस्थितीत मृत्यू देखील होऊ शकतो. सत्य सांगायचे तर, सचिन वेळेत डॉक्टर्सकडे पोहोचल्यामुळे त्याचे प्राण वाचले.
वैद्यकीय शास्त्र काय सांगतं?
अमेरिकन सायकेट्रिक असोसिएशन आणि NCBI नुसार अशा प्रकरणामागे मानसिक डिसऑर्डर असू शकतो. पिका डिसऑर्डरमध्ये लोक अशा वस्तू खाण्याचा विचार करत नाहीत की ते धोकादायक आहेत. इंपल्सिव कंट्रोल डिसऑर्डर किंवा OCD (ऑब्सेसिव-कंपल्सिव डिसऑर्डर) मध्ये अशा कृती नशेत किंवा गोंधळलेल्या मानसिक स्थितीत घडतात.
advertisement
ही घटना पहिल्यांदाच घडली नाही, यापूर्वीही समोर आले विचित्र प्रकरण
2016 मध्ये बांग्लादेशात 28 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून 19 टूथब्रश आणि बॅटरी शेल काढले गेले.
2017 मध्ये ताण-तणावात असलेल्या एका व्यक्तीच्या पोटातून 19 टूथब्रश काढण्यात आले.
2019 मध्ये हिमाचल प्रदेशात एका व्यक्तीच्या पोटातून चमचे, स्क्रूड्रायव्हर आणि चाकू बाहेर काढले गेले.
2025 मध्ये चीनमध्ये 64 वर्षीय व्यक्तीच्या आंतातून 52 वर्ष जुना टूथपेस्ट काढण्यात आला.
advertisement
सारांश म्हणजे, मानवी शरीरातील पोट हे एक चमत्कारिक अंग आहे, पण चुकीच्या गोष्टी खाल्ल्या की गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सचिनसारख्या प्रकरणांमधून डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ मानसिक आरोग्याच्या गंभीरतेची जाणीव करून देतात, तसेच वेळेवर वैद्यकीय उपचार किती महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/Viral/
29 चमचे आणि 19 टूथब्रश गिळूनही तो जिवंत? हे कसं शक्य? X-ray पाहाताच डॉक्टरही हादरले