नवऱ्यासोबत गरबा खेळणाऱ्या तरुणीला हार्टअटॅक; नाचता नाचता 19 वर्षीय सोनमसोबतचा धक्कादायक प्रकार Video मध्ये कैद
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मागच्या दोन चार वर्षांपासूनच नवरात्रीला गरबा खेळताना लोक मृत्यूमुखी पडले असल्याचे अनेक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात घडली.
मुंबई : नवरात्रीचे दिवस सुरू झाले की सर्वत्र भक्तीमय आणि उत्सवी वातावरण दिसून येते. दुर्गा पंडाल सजतात, तरुणाई गरब्याच्या रंगात रंगते. पण या उत्साहाच्या गर्दीत आजकाल एक मोठी समस्या वारंवार समोर येऊ लागली आहे. हार्ट अटॅक. पूर्वी ही समस्या केवळ वयोवृद्धांपुरती मर्यादित मानली जायची, पण आता तरुण, अगदी लहानमुलांमध्ये याप्रकारचे आजार दिसू लागले आहेत.
त्यात मागच्या दोन चार वर्षांपासूनच नवरात्रीला गरबा खेळताना लोक मृत्यूमुखी पडले असल्याचे अनेक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात घडली.
खरगोनच्या भीकनगाव तालुक्यातील पलासी गावात रविवारी उशिरा रात्री दुर्गा पंडालात गरब्याचे आयोजन झाले होते. भक्तीगीतांसोबत काही चित्रपटांच्या गाण्यांवरही लोक नाचत होते, आनंद लूटत होते. याच कार्यक्रमात सोनम तरुणी आपला नवरा कृष्णपालसोबत गरबा खेळण्यासाठी आली होती.
advertisement
सोनमने फक्त 19 वर्षांची होती आणि नुकतंच तिचं लग्न झालं होतं. "मेरे ढोलनाआ" या गाण्यावर ती आपल्या नवऱ्यासोबत नृत्य करत होती. डान्सदरम्यान ती आपल्या पतीकडे बोट दाखवत गाण्याच्या ओळींवर आनंदाने मजा घेत होती. पण अचानकच तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. काही क्षणासाठी आजूबाजूच्या लोकांना काहीच कळले नाही.
अखेर नवरा कृष्णपाल तिला उचलायला धावला, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. डॉक्टरांना बोलावलं असता त्यांनी सोनमचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. प्राथमिक कारण हार्ट अटॅक असल्याचं समोर आलं.
advertisement
#WATCH | 19-Year-Old Married Woman Suffers Heart Attack While Performing Garba In MP's Khandwa#MadhyaPradesh #MPNews pic.twitter.com/Jvz7NQcetM
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) September 29, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, सोनम ही टेमला गावची रहिवासी होती. तिचं लग्न फक्त वर्षभरापूर्वी म्हणजे 1 मे रोजीच पलासी गावातील कृष्णपालसोबत झालं होतं. नवविवाहित म्हणून ती पहिल्यांदाच पतीसोबत पंडालात सहभागी झाली होती. पण दुर्दैवाने हा आनंदोत्सव तिच्या आयुष्याचा शेवट ठरला.
advertisement
सोमवारी सकाळी कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिचे अंत्यसंस्कार पार पडले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 7:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
नवऱ्यासोबत गरबा खेळणाऱ्या तरुणीला हार्टअटॅक; नाचता नाचता 19 वर्षीय सोनमसोबतचा धक्कादायक प्रकार Video मध्ये कैद