या गावात होळीला रंग नाही तर एकमेकांवर फेकतात दगड; 30 लोक पोहोचले रुग्णालयात

Last Updated:

डुंगरपूर जिल्ह्यात होळीची अनोखी आणि धोकादायक परंपरा आजही पाळली जात आहे. डुंगरपूर जिल्ह्यातील भिलुडा गावात सोमवारी धुलिवंदनच्या दिवशी दगडफेकीची होळी खेळण्यात आली.

दगडाने खेळतात होळी
दगडाने खेळतात होळी
जयपूर : होळीचा सण देशभरात गुलाल आणि रंगांनी खेळला जातो. मात्र आदिवासीबहुल डुंगरपूर जिल्ह्यात होळीची अनोखी आणि धोकादायक परंपरा आजही पाळली जात आहे. डुंगरपूर जिल्ह्यातील भिलुडा गावात सोमवारी धुलिवंदनच्या दिवशी दगडफेकीची होळी खेळण्यात आली. येथे लोकांनी रंग आणि गुलालाऐवजी एकमेकांवर दगडफेक केली. यामध्ये 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दगडफेकीच्या जखमेतून वाहणाऱ्या रक्तामुळे परिसरात समृद्धी येते, असा समज आहे.
भिलुडाची दगडफेक होळी पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील हजारो लोक एकत्र येतात. सोमवारीही संध्याकाळ यासाठी भिलुडासह आसपासच्या गावातील लोक ढोल ताशाच्या तालावर नाचत निघाले. गावातील रघुनाथजी मंदिराजवळ लोक जमा झाले. मंदिराजवळील मैदानावर येताच तरुण दोन गटात विभागले आणि त्यानंतर रक्तरंजित होळी सुरू झाली.
दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. दगडफेकीत अनेकांच्या हाताला, पायाला आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत. होळीच्या दगडफेकीत अनेकजण रक्तबंबाळ झाले. दगडफेकीदरम्यान अनेक लोक झाडांच्या मागे लपून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. होळीच्या दिवशी झालेल्या दगडफेकीत 30 हून अधिक जण जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं असून उपचार केले आहेत.
advertisement
दगड आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून अनेक गावातील लोक दूरवर बसून दगडफेक होळी पाहत होते. होळीला दगड मारण्याची ही परंपरा 100 वर्षांपूर्वीपासून पाळली जात आहे. गावातील लोक आजही ते सांभाळत आहेत. दगडाने जखमी झालेल्या व्यक्तीचे रक्त जमिनीवर पडल्यास गावाला धोका नसतो, असा समज आहे. गावात समृद्धी राहाते, असा त्यांचा समज आहे.
मराठी बातम्या/Viral/
या गावात होळीला रंग नाही तर एकमेकांवर फेकतात दगड; 30 लोक पोहोचले रुग्णालयात
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement