हा मासा सर्वांनाच करतोय आपल्याकडे आकर्षित, Video पाहून तुम्हालाही कळेल यामागचं कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पाण्यातील दुनिया ही वेगळीच आहे. खोल समुद्रात तर अशा गोष्टी आणि जीव लपलेले आहेत की काहींबद्दल तर आपल्याला माहिती देखील नाही.
मुंबई, 16 सप्टेंबर : अनेकदा अप्रतिम आणि अनोखे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी प्राण्यांशी संबंधी असतात किंवा कधी माणसांशी. तर कधी कधी एखाद्या ठिकाणाशी. हे व्हिडीओ पाहून नेहमीच आश्चर्य वाटतं. एक असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही चकीत व्हाल. हा व्हिडीओ माशांशी संबंधीत आहे.
आपल्याला तर हे माहित आहे की पाण्यातील दुनिया ही वेगळीच आहे. खोल समुद्रात तर अशा गोष्टी आणि जीव लपलेले आहेत की काहींबद्दल तर आपल्याला माहिती देखील नाही. तर काही पाहूनच विचित्र वाटतात.
तुम्ही नदी, तलाव किंवा विहिरीत मासे पोहताना अनेकदा पाहिले असेल. काही मासे इतके सुंदर असतात की ते आपल्याला आकर्षित करतात. अशाच एका माशाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हा मासा तुमच्याकडे बघून हसताना दिसत आहे.
advertisement
व्हिडीओ सुरू होताच समोर काही मासे दिसत असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्यांच्या तोंडाचा आकार अगदी वेगळा आहे आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर असे दिसते की हे मासे हसत आहेत.
Here’s a smile to start your new week.. pic.twitter.com/pJTpZ2tk0M
— Buitengebieden (@buitengebieden) September 11, 2023
advertisement
हा व्हिडिओ X वर @buitengebieden नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखोवेळा पाहिलं आहे. माशांच्या अशा वागण्याने लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलं आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट करत आहेत आणि या व्हिडीओला शेअर देखील करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 16, 2023 7:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
हा मासा सर्वांनाच करतोय आपल्याकडे आकर्षित, Video पाहून तुम्हालाही कळेल यामागचं कारण









