snake : कितीही विषारी साप असला तरी त्याला हा वास आला तर तो घरात प्रवेश करत नाही, हे तुम्हाला माहितीये का?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
साप त्याच्या जिभेच्या माध्यमातून वास ओळखतो. जर तुम्ही या वस्तू घरात ठेवल्या तर साप येणार नाहीत.
मुंबई, 20 डिसेंबर : जेव्हा माणसाचा सामना साप किंवा नागाशी होतो तेव्हा तो प्राणी किती धोकादायक आहे याची जाणीव होते. साप आणि माणूस यांच्यात कोण जास्त बलवान आहे हे सांगायची गरज नाही. साप किंवा नाग नुसता दिसला तरी माणसाची भीतीनं गाळण उडते. अशा स्थितीत माणूस साप, नागाला पळवून लावण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. या जगात अशी कोणती गोष्ट आहे, जिच्या वासाने साप किंवा नाग पळून जातो? माणसाला या गोष्टींची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या घरात कधी सापाचा धोका निर्माण झाला तर ते त्यास सामोरे जाऊ शकतील.
'न्यूज 18'च्या 'अजब-गजब ज्ञान' या सीरिज अंतर्गत आम्ही तुमच्यासाठी देश आणि जगाशी संबंधित आश्चर्यकारक माहिती घेऊन येत असतो. सापांना पळवून लावण्यासाठी कोणत्या प्रकारचा वास प्रभावी ठरतो, याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. वास्तविक कोरा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणीतरी याशी संबंधित प्रश्न विचारला होता. अनेकांनी त्याची उत्तरे ही दिली आहेत. ही उत्तरं नेमकी काय आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
'कोरा'वर लोकांनी नेमकी काय उत्तरं दिली?
निर्मला ठाकूर नावाच्या युजरनं सांगितलं की, 'फोरेट नावाची पावडर यासाठी उपयुक्त आहे. या पावडरच्या वासामुळे साप दूर पळतो.' देवेश पंडित यांनी कमेंट केली आहे की, 'घुडबच किंवा घोडाबच, बाच नावाची औषधी वनस्पती घरात रोज जाळली तर तिच्या धुरामुळे साप घरात येत नाहीत, असं मी वाचलं आहे. 'सापाला रॉकेलचा वास अजिबात सहन होत नाही. त्यामुळे तो त्याच्याजवळ येत नाही,' असं राजेंद्र कुमार नावाच्या युजरनं सांगितलं आहे. यावर लोकांनी अनेक उपयुक्त पर्याय सांगितले आहेत. या पर्यायांचा वापर केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.
advertisement
कोणत्या वस्तूंच्या वासापासून साप दूर पळतात ?
खरं तर ही सामान्य लोकांची उत्तरं होती. या संदर्भात जाणकार किंवा विश्वसनीय सूत्र काय म्हणतात ते जाणून घेऊया. प्राण्यांशी संबंधित a-z-animal या वेबसाईटने या संदर्भात 14 वस्तूंचा उल्लेख केला आहे. या वस्तूंच्या वासापासून साप दूर पळतात. यात प्रामुख्याने लसूण आणि कांदा, पुदिना, लवंग, तुळस, दालचिनी, व्हिनेगर, लिंबू आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे अमोनिया वायू यांचा समावेश आहे. अनेकवेळा सापांना धुरामुळे ही त्रास होतो. त्यामुळे धूर करूनही सापांना दूर पळवता येतं. सापांना या सर्व गोष्टींचा वास अजिबात सहन होत नाही. त्यामुळे ते या वस्तूंपासून दूर पळतात. साप त्याच्या जिभेच्या माध्यमातून वास ओळखतो. जर तुम्ही या वस्तू घरात ठेवल्या तर साप येणार नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2023 8:50 PM IST
मराठी बातम्या/Viral/
snake : कितीही विषारी साप असला तरी त्याला हा वास आला तर तो घरात प्रवेश करत नाही, हे तुम्हाला माहितीये का?