ट्रेनच्या टॉयलेटमधून विचित्र आवाज; GRP ने दरवाजा उघडला, दृश्य पाहून जबर धक्का

Last Updated:

तिथे त्याने असा प्रकार पाहिला की तो भडकला. याबाबत त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना माहिती दिली.

ट्रेनच्या टॉयलेटमध्ये काय करत होते प्रवासी?
ट्रेनच्या टॉयलेटमध्ये काय करत होते प्रवासी?
नवी दिल्ली : प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून जीआरपी आणि आरपीएफचे जवान ट्रेनमध्ये तपासणी करत होते. तेव्हा ट्रेनमधील एका डब्याच्या टॉयलेटमधून विचित्र आवाज ऐकू येत होता. यानंतर त्यांनी शौचालयाचा दरवाजा उघडला. तिथं जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना माहिती दिली.
ऑपरेशन नार्कोस अंतर्गत प्रयागराज विभागातून जाणाऱ्या गाड्यांची तपासणी होत होती. ट्रेन क्रमांक 118309 यूपी मुरी एक्स्प्रेस चुनार इथं आली. GRP आणि RPF टीमने संयुक्तपणे तपासणी केली.
ट्रेनच्या S-4 आणि S-5 स्लीपर कोचच्या टॉयलेटच्या छतावरून आवाज येत होता. टॉयलेटचा दरवाजा उघडून सीलिंग तोडलं. जे दिसलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला.
advertisement
तिथं होतं काय?
तिथं 2 किलो वजनाचं एक अशी एकूण 50 किलो वजनाची गांजाची एकूण 25 पाकिटं आढळून आली.
गांजाचा एवढा मोठा साठा सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ट्रेनच्या इतर डब्यांची तपासणी करण्यात आली.
advertisement
हा गांजा  घेऊन जाणाऱ्या तस्करांचा शोध घेण्यासाठी तपास पथकाने खूप प्रयत्न केले, मात्र कोणीही पकडलं गेलं नाही.
ट्रेनच्या टॉयलेटमध्ये प्रवासी गुपचूप करतात हे काम
याआधी उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागातून जाणाऱ्या गाड्यांमध्ये तिकीट तपासणी सुरू असताना टीटीला बंद टॉयलेटमधून उग्र वास येत आला. टीटीनं दरवाजा ठोठावला. बऱ्याच वेळानंतर टॉयलेटचा दरवाजा उघडला. आतलं दृश्य पाहून टीटीईला आश्चर्य वाटलं.
advertisement
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेनमधील बरेच प्रवासी सीट किंवा बर्थमध्ये धुम्रपान करत नाहीत तर बाथरूममध्ये जातात. तपासणी पथकाला बाथरूमच्या आजूबाजूला सिगारेट किंवा विडीच्या धुराचा वास आल्यावर ते दार ठोठावतात. अशा स्थितीत दरवाजा उघडला असता आत धूर दिसतो. अशा प्रवाशांवर रेल्वे तातडीने कारवाई करते.
मराठी बातम्या/Viral/
ट्रेनच्या टॉयलेटमधून विचित्र आवाज; GRP ने दरवाजा उघडला, दृश्य पाहून जबर धक्का
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement