बाबो! घटस्फोटानंतर नवऱ्याने 40 लीटर दुधाने केली अंघोळ, कारणही अजब, म्हणाला, बायको...

Last Updated:

Man Bathes In Milk After : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अली त्याच्या घराबाहेर प्लॅस्टिकच्या शीटवर चार बादल्या दूध घेऊन उभा असल्याचं दिसून येतं. ते दूध तो आपल्या अंगावर ओततो. 

News18
News18
नवी दिल्ली : विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोटाची प्रकरणं काही कमी नाहीत. घटस्फोटानंतर काही दुसरा जोडीदार शोधून नव्याने आयुष्य जगू लागतात, तर काही लोक एकाकी आयुष्य जगतात. पण आता तर घटस्फोटानंतर काही लोक सेलिब्रेशनही करू लागले आहेत. अशाच घटस्फोटानंतरच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
आसाममधील हे प्रकरण आहे. आसामच्या माणिक अली नावाची ही व्यक्ती. जिचा घटस्फोट झाला आणि या व्यक्तीने तो साजरा केला. हा त्याच्यासाठी आनंदाचा दिवस होता कारण त्याला अखेर स्वातंत्र्य मिळालं ज्याची तो वाट पाहत होता. त्याने तो दिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला, त्याने दुधाने अंघोळ केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अली त्याच्या घराबाहेर प्लॅस्टिकच्या शीटवर चार बादल्या दूध घेऊन उभा असल्याचं दिसून येतं. ते दूध तो आपल्या अंगावर ओततो.
advertisement
advertisement
अलीने आपलं हे सेलिब्रेशन  कॅमेऱ्यात कैद केलं आहे. तो म्हणतो, 'बायको तिच्या प्रियकरासोबत वारंवार पळून जात होती.पत्नी यापूर्वी किमान दोनदा घरातून पळून गेली होती. तेव्हा कुटुंबाची शांती राखण्यासाठी मी गप्प राहिलो
माझ्या वकिलाने आता मला सांगितलं की घटस्फोट निश्चित झाला आहे. म्हणून, आज मी माझ्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी दुधाने स्नान करत आहे."
advertisement
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि त्यावर विविध प्रतिक्रियाही येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
मराठी बातम्या/Viral/
बाबो! घटस्फोटानंतर नवऱ्याने 40 लीटर दुधाने केली अंघोळ, कारणही अजब, म्हणाला, बायको...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement