advertisement

Shocking! खोकला आला, कोरडी पडली त्वचा अन्...; झोपेतून उठताच तरुणी बनली 'सरडा'

Last Updated:

महिलेला सुरुवातीला खोकला आला. यानंतर तिची त्वचा कोरडी पडू लागली आणि विचित्र खुणा दिसू लागल्या.

फोटो - सोशल मीडिया
फोटो - सोशल मीडिया
वॉशिंग्टन : काही वेळा अशा काही घटना घडतात ज्यावर विश्वास ठेवणं अशक्य होतं. अशीच एक घटना. ज्यात एक महिला पालीसारखी झाली आहे. ही महिला झोपेतून उठली तीच सरडा बनली. सुरुवातीला डॉक्टरांनाही यामागील कारण समजलं नाही. पण नंतर त्यांनी जे सांगितलं ते धक्कादायक आहे. अमेरिकेतील हे विचित्र प्रकरण चर्चेत आलं आहे.
लॉरा ओटिंग असं या महिलेचं नाव आहे. तिनं आपल्या या विचित्र आजाराबाबत सांगितलं आहे. लॉराने सांगितल्यानुसार नोव्हेंबर 2020 च्या अखेरीस तिला कोरडा खोकला होऊ लागला. तिला वाटलं की ती कोविडची शिकार झाली आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात तिच्या डझनभर कोविड-19 चाचण्या झाल्या. मात्र त्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. तिचा खोकला सुरू होता.
advertisement
2021 च्या सुरुवातीला अचानक तिच्या बोटांवरची त्वचा सरडा किंवा सापासारखी निघू लागली. याशिवाय तिच्या खांद्यावर आणि हातावर विचित्र खुणा दिसू लागल्या. तिनं अनेक डॉक्टर बदलले, औषधं बदलली, क्रीम बदलले, लोशन बदलले पण काहीच उपयोग झाला नाही. कालांतराने तिच्या वेदना, पुरळ आणि त्याचं प्रमाणही वाढलं. तिला कपडे घालता येत नव्हते, झोप येत नव्हती, बूटही घालता येत नव्हते. लॉरानं सांगितलं की ही लक्षं काही दिवसांपासून होती. पण एक दिवस सकाळी उठल्यानंतर या लक्षणांनी गंभीर रूप धारण केलं.
advertisement
तिच्या अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्या. पण तिच्या आजाराचं नेमकं निदान होईना. अखेर तिला काय झालं आहे हे समजलं आणि तिला धक्काच बसला. तिला एक दुर्मिळ ऑटो इम्युन डिसीज झाला होता.  पिटिरियासिस रुब्रा पिलारिस (पीआरपी) असं या आजाराचं नाव.
advertisement
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे. अमेरिकेत फक्त 800 लोकांना हा दुर्मिळ आजार आहे. केमोथेरपीच्या अनेक सेशननंतर लॉराची प्रकृती आता ठिक आहे आणि ती बरी होत आहे. आता ती मॅरेथॉनमध्ये धावते. अशा रोगांपासून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, एकतर भीतीने जगणं किंवा धैर्यानं जगणं, असं ती म्हणाली.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Shocking! खोकला आला, कोरडी पडली त्वचा अन्...; झोपेतून उठताच तरुणी बनली 'सरडा'
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement