OMG! 30 वर्षांत एकदाही झोपली नाही महिला, 24 तास उघडे असतात डोळे
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
या महिलेने तिच्या आयुष्यातली 30 वर्षं जागून घालवली आहेत. या महिलेची संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही, की असंही कोणी तरी करू शकतं.
तुम्ही 'स्लीपिंग ब्युटी'ची गोष्ट ऐकली असेल. त्यामधली राजकुमारी नेहमी झोपलेली असायची. आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबद्दल सांगणार आहोत जिला प्रयत्न करूनही झोप येतच नाही. विशेष असं, की तिला कोणताही आजार नाही. या महिलेने तिच्या आयुष्यातली 30 वर्षं जागून घालवली आहेत. या महिलेची संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही, की असंही कोणी तरी करू शकतं.
ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या एका महिलेने दावा केला आहे, की मागच्या 30 वर्षांत ती कधीच झोपली नाही. खास म्हणजे यामागचं कारण कुठलाही आजार हे नाही, तर तिने सरावाने आपल्या शरीराला अशी सवय लावून घेतली आहे. हे ऐकायला खूप विचित्र वाटतं; पण या महिलेच्या म्हणण्यानुसार हे करण्यासाठी तिला बरीच वर्षं लागली.
advertisement
महिला 30 वर्षांपासून झोपलेली नाही
ही गोष्ट व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या 49 वर्षीय गुएन नगॉक माय किम नावाच्या महिलेची आहे. ही महिला ती जिथे राहते त्या भागात 'कधीही न झोपणारी' म्हणून ओळखली जाते. महिला ही ओळख मिळवून आनंदी आहे. तिच्या मते ती अनेक दशकांपासून अजिबात झोपलेली नाही. झोप न आल्याने तिच्या तब्येतीवर कोणतेही नकारात्मक परिणाम झालेले नाहीत. ती न झोपता आरामात जगू शकते आणि आता तिला झोपण्याची गरज वाटत नाही.
advertisement
न झोपणं हा आजार नाही तर सराव
किमचा दावा आहे, की ती आधीपासून अशी नव्हती. तसंच तिला झोपेबद्दलचा कोणताही आजार नाही. ती लहान असताना तिला वाचनाची आवड होती. त्यामुळे ती रात्री उशिरापर्यंत वाचन करत करायची. जेव्हा ती टेलर (कपडे शिवणारी) बनली, तेव्हा तिच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ती कधी कधी रात्रभर झोपत नसे. तिला थकवा जाणवायचा व झोपही यायची. त्यामुळे अनेकदा ती काही तरी चुकीचं करायची आणि अपघातही व्हायचे; पण अनेक महिने अशाच रीतीने जागं राहिल्यानंतर तिचं शरीर व डोळे यांना जागायची सवय लागली. आता तिला इच्छा असूनही झोप येत नाही. तिच्या दुकानाचे लाइट सतत चालू असतात आणि दरवाजा सतत उघडा असतो. कोणीही आत जाऊन त्यांना काम करताना पाहू शकतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 03, 2024 2:00 PM IST


