बैलगाडा शर्यतीत जालन्यातील देवा आणि चांदला हिंदकेसरी, डिजे लावून काढण्यात आली जंगी मिरवणूक

Last Updated:

जालना जिल्ह्यातील शामराव राठोड आणि शेषराव राठोड यांच्या देवा आणि चांद या बैलांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. यानिमित्त गावात डीजे लावून या बैलजोडीची जंगी मिरवणूक काढण्यात आली.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. मराठवाड्यामध्ये देखील अनेक बैलगाडा शर्यतीचे चाहते आहेत. जिल्ह्यातील वखारी येथील शामराव राठोड आणि शेषराव राठोड यांच्या देवा आणि चांद या बैलांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. यानिमित्त गावात डिजे लावून या बैलजोडीची जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर मानाचा हिंदकेसरी होण्याचा मान मिळवल्याने या बैलजोडीची किंमत देखील चांगलीच वाढली असून या दोन्ही बैलांना मिळून 20 लाख रुपयांपर्यंत मागणी झाली आहे.
advertisement
सद्‌गुरु सेवागिरी महाराजांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत जालना तालुक्यातील वखारी येथील शेषराव राठोड यांच्या चांद आणि शामराव राठोड यांच्या देवा या दोन बैलांनी हे मैदान चांगलेच गाजविले आहे. या बैलांनी तीन फेरी पळून तिसऱ्या क्रमांकाचे असलेले 1 लाख 51 हजाराच्या बक्षीसाचे मानकरी ठरले आहे. या बक्षीसाचे मानकरी ठरल्याबद्दल गावात देवा आणि चांद या जोडीची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.
advertisement
बैल मालक शामराव राठोड आणि शेषराव राठोड हे सामान्य कुटुंबातील शेतकरी आहेत. यांना बैलगाडा शर्यतीचा छंद आहे. हा छंद जोपसताना यांना बैलाची व्यवस्था करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. स्वतःच्या लेकरासारखे जपावे लागते. चांद आणि देवा यांनी महाराष्ट्रभर बैलगाडा शर्यतीचे थरारक मैदान गाजविले आहे. पुसेगाव मैदान तिसऱ्या क्रमांक येऊन 1 लाख 51 हजार आणि मानाची ढाल देण्यात आली. हे बक्षीस मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी आतषबाजी करून स्वागत केले आहे.
advertisement
गावाचे नाव झळकावले
आमचे गावास बैलगाडा शर्यतीत खूप रस आहे. सामान्य कुटुंबातील शामराव राठोड आणि शेषराव राठोड यांच्या देवा आणि चांद यांनी गावाचे आणि मालकाचे नाव रोशन केले याबद्दल आम्हाला अभिमान असल्याचे मांगीलाल पवार यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
बैलगाडा शर्यतीत जालन्यातील देवा आणि चांदला हिंदकेसरी, डिजे लावून काढण्यात आली जंगी मिरवणूक
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement