पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड, चेकनेट बोरांनी आणला जीवनात गोडावा, शेतकऱ्याची लाखोंची कमाई
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सोलापुरातील शेतकरी दिनेश भोसले यांनी रंगाने हिरवट, चवीला गोड आणि बाजारात मागणी असणाऱ्या चेकनेट बोराच्या शेतीतून अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवता येते हा विचार करून त्यांनी ही शेती केली आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : सध्याच्या घडीला शेतकरी पारंपरिक शेतीतून खर्चही निघत नसल्याने आधुनिक शेतीकडे वळत आहेत. सोलापुरातील शेतकरी दिनेश भोसले यांनी रंगाने हिरवट, चवीला गोड आणि बाजारात मागणी असणाऱ्या चेकनेट बोराच्या शेतीतून अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवता येते हा विचार करून त्यांनी ही शेती केली आहे.
advertisement
सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील पापरी या गावातील प्रयोगशील शेतकरी दिनेश नागनाथ भोसले यांचे शिक्षण नववी पर्यंत झालेले आहे. दिनेश हे आधी उमराण या बोरांच्या झाडांची लागवड करत होते. मात्र उमराण या बोरांच्या विक्रीतून खर्चही निघत नव्हता. त्यानंतर शेतकरी दिनेश यांनी उमराण या बोरांच्या झाडांना कलम करून चेकनेट भोरांची लागवड केली आहे.
advertisement
चेकनेट बोरांना मागणी जास्त आणि खर्च कमी असल्याने या बोरांच्या झाडाची लागवड त्यांनी एका एकरात केली आहे. एका एकरात दिनेश भोसले यांनी 160 चेकनेट बोरांच्या रोपांची लागवड केली आहे. चेकनेट बोरांच्या रोपांचा कलम भरण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. बाजारात चेकनेट बोरांना भाव 50 रुपयांपासून ते 100 रुपये किलो पर्यंत आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यासह पुणे, पंढरपूर या ठिकाणी चेकनेट बोर विक्रीसाठी पाठवण्यात येतात. चेकनेट बोरांच्या एक किलोच्या जाळीच्या पिशव्या भरून ते बाजारात विक्रीसाठी पाठवतात. चेकनेट बोराच्या विक्रीतून दिनेश भोसले यांना अडीच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. चेकनेट बोरे नारिंगी- पिवळसर रंगाची, स्वादिष्ट, गोड आणि आकारालाही चांगली असतात.
शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढता येईल या पद्धतीने जर शेती केली तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि शेती परवडेल, अशी माहिती शेतकरी दिनेश भोसले यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 16, 2025 4:49 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड, चेकनेट बोरांनी आणला जीवनात गोडावा, शेतकऱ्याची लाखोंची कमाई









