फायद्याची शेती! एका एकरात 450 रोपांची केली लागवड, हे झाड करणार शेतकऱ्याला लखपती Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
शेतकरी प्रयोगशील झाला असून तो शेतात नवनवीन प्रयोग करू लागला आहे. असाच प्रयोग शेतकरी अनंत मेटकरी यांनी आपल्या शेतात केला असून त्यांनी मोहगणी या झाडांची लागवड केली आहे. त्यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : शेतकरी प्रयोगशील झाला असून तो शेतात नवनवीन प्रयोग करू लागला आहे. असाच प्रयोग पंढरपूर तालुक्यातील अनवली गावातील शेतकरी अनंत मेटकरी यांनी आपल्या शेतात केला असून त्यांनी मोहगणी या झाडांची लागवड केली आहे. त्यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
अनंत मेटकरी राहणार अनवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी एका एकरात मोहगणी या झाडांची लागवड केली आहे. एका एकरात 450 रोपांची लागवड अनंत यांनी केली आहे. एका एकरात 10 बाय 10 या अंतरावर या मोहगणीच्या झाडाची लागवड केली आहे. एका एकरात लागवड करण्यासाठी 50-60 हजार रुपये खर्च येतो. झाडाच्या लाकडीला चागलीच मागणी आहे. या लाकडाचा वापार पाण्यातील जहाजाला सुध्दा वापर केला जातो. मोहगणीचा लाकूड 100 शंभर वर्ष सुद्धा पाण्यात ठेवला तरी खराब होत नाही. तसेच फर्निचर बनवणे, कॅबिनेटरी आणि इतर लाकूडकाम प्रकल्पांसह विविध अनुप्रयोगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
advertisement
पर्यावरणाची हानी न करता जमिनीचा वापर करुन महोगनीच्या झाडाचा व्यवसाय करु शकता. मात्र, यामध्ये तुम्हाला काही काळ या व्यवसायात थोडा वेळ थांबावा लागेल. चार वर्षानंतर शेतकरी अनंत मेटकरी यांना मोहगणीच्या झाडांच्या विक्रीतून 50 ते 70 लाखांचा नफा मिळणार असल्याची माहिती अनंत मेटकरी यांनी दिली.
advertisement
तसेच अनंत मेटकरी यांनी या मोहगणीच्या झाडांमध्ये आंतरपीक सुद्धा घेता येते. अनंत मेटकरी यांनी मोहगणीच्या शेतात आंतरपीक म्हणून गुलाबाची शेती सुध्दा केली आहे. गुलाबाच्या विक्रीतून सुध्दा प्रयोगशील शेतकरी अनंत मेटकरी यांना दिवसाचे 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये मिळत आहे. शेतकऱ्यांनी मोहगणी झाडांची लागवड करुन त्यात आंतरपिक घेतल्यास ही शेती नक्की परवडेल, अशी माहिती शेतकरी अनंत मेटकरी यांनी दिली.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
January 14, 2025 2:17 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
फायद्याची शेती! एका एकरात 450 रोपांची केली लागवड, हे झाड करणार शेतकऱ्याला लखपती Video

