Farmer Success Story: 9 वर्षांपासून करताय डाळिंब शेती, वर्षाला लाखांत मिळतेय उत्पन्न, शेतकऱ्याने सांगितला यशस्वी शेतीचा मंत्र
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
शेतकरी श्रीपत दंदाळे यांनी 3500 डाळिंब झाडांची लागवड केलेली आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील सटाणा येथील शेतकरी श्रीपत दंदाळे हे 8 ते 9 वर्षांपासून डाळिंब फळबाग शेती करत आहेत. शेतात त्यांनी 3500 डाळिंब झाडांची लागवड केलेली आहे. या माध्यमातून त्यांना गतवर्षी 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले होते. यंदा पाऊस चांगला असल्याने देखील आंब्या बहारात सव्वा 1 लाख रुपयांचे उत्पन्न निघाले असून आणखी मृग बहारात 2 लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा दंदाळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
जालना रोडवर सटाणा येथे 9 ते 10 एकरमध्ये एकूण 3500 हजार डाळिंब झाडांची लागवड दंदाळे यांनी आपल्या शेतात केली आहे. डाळिंब लागवडीचे क्षेत्रफळ मोठे असल्यामुळे काही प्रमाणात प्राण्यांनी देखील डाळिंबाचे नुकसान केलेले आहे त्यामुळे थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने डाळिंबाचा 1200 ते 1300 रुपये भावाने प्रति कॅरेट गेला असल्यामुळे याचा उत्पन्नाला फायदा होणार आहे.
advertisement
डाळिंब शेतीमध्ये खत आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात खर्च असतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांच्या फवारण्या यावर कराव्या लागतात तसेच याची वेळोवेळी काळजी घेणे देखील चांगल्या उत्पन्नासाठी तितकेच महत्त्वाचे ठरते. जो शेतकरी डाळिंब शेतीत मेहनतीने आणि टिकून काम करेल, तसेच स्वतःला सर्व कामे करावे लागतात त्यांच्यासाठी डाळिंब शेती नक्कीच फायदेशीर असल्याचे देखील दंदाळे यांनी सांगितले आहे.
advertisement
डाळिंब शेतीचा प्रयोग यशस्वी केल्यामुळे परिसरातील सर्व शेतकरी दंदाळे यांचे कौतुक करत असून त्यांच्याकडून डाळिंब शेतीबद्दल मार्गदर्शन देखील घेत आहेत.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
September 01, 2025 5:54 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: 9 वर्षांपासून करताय डाळिंब शेती, वर्षाला लाखांत मिळतेय उत्पन्न, शेतकऱ्याने सांगितला यशस्वी शेतीचा मंत्र