advertisement

Mint farming : उन्हाचा तडाखा वाढला! 'या' पिकाला होतेय देशभरातून मागणी, लागवड केल्यास व्हाल लखपती

Last Updated:

Agriculture News : वाढत्या तापमानामुळे पुदिन्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. थंडावा देणाऱ्या गुणधर्मांमुळे आणि औषधी तसेच सुगंधी पदार्थांमध्ये वापर होण्यामुळे पुदिना आता शेतकऱ्यांसाठी कमाईचे एक उत्तम साधन बनले आहे. भारत हा पुदिना तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे, त्यामुळे त्याच्या शेतीकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळत आहेत.

News18
News18
मुंबई: वाढत्या तापमानामुळे पुदिन्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. थंडावा देणाऱ्या गुणधर्मांमुळे आणि औषधी तसेच सुगंधी पदार्थांमध्ये वापर होण्यामुळे पुदिना आता शेतकऱ्यांसाठी कमाईचे एक उत्तम साधन बनले आहे. भारत हा पुदिना तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे, त्यामुळे त्याच्या शेतीकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळत आहेत.
पुदिना शेतीतून लाखोंची कमाई
शेतकरी एका एकरमध्ये पुदिन्याची लागवड करू इच्छित असतील, तर त्यासाठी सुमारे 30,000 रुपये खर्च येतो. एक एकर क्षेत्रातून सुमारे 1 लाख रुपयांचे पुदिना तेल मिळते, त्यामुळे खर्च वजा जाता शेतकऱ्यांना एकरी सुमारे 70,000 रुपये नफा मिळू शकतो.
कधी करावी पुदिन्याची लागवड?
पुदिन्याची लागवड फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केली जाते.लागवडीसाठी सुपीक माती आवश्यक असून, तिचा pH स्तर 6 ते 7.5 च्या दरम्यान असावा. शेतात चांगली नांगरणी करून आणि योग्य मशागत करूनच पुदिना लावावा. लागवडीनंतर शेताला हलके पाणी देणे गरजेचे असते.
advertisement
खत व्यवस्थापन किती आवश्यक?
पुदिन्याचे उत्तम उत्पादन मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात खते वापरणे महत्त्वाचे आहे.
नायट्रोजन: 120-150 किलो प्रति हेक्टर
फॉस्फरस: 50-60 किलो प्रति हेक्टर
पोटॅश: 40 किलो प्रति हेक्टर
गंधक: 20 किलो प्रति हेक्टर
पुदिन्याची काढणी कधी आणि कशी करावी?
पुदिन्याचे पीक 100-120 दिवसांत तयार होते.झाडांना कळ्या दिसू लागल्यानंतर ते कापणीसाठी योग्य अवस्थेत असते. झाडाच्या वरच्या 4-5 सेमी भागाची कापणी केली जाते. पुदिन्याची कापणी वर्षातून दोनदा करता येते, त्यामुळे उत्पादन आणि नफा अधिक मिळतो.
advertisement
पुदिन्याच्या तेलाची किंमत किती आहे?
पुदिन्याच्या तेलाची बाजारातील किंमत प्रति लिटर 1,800 ते 3,500 रुपयांपर्यंत असते. यामुळे शेतकऱ्यांना पुदिना शेतीतून मोठा नफा मिळवता येतो.
पुदिन्याच्या शेतीचे फायदे
कमी खर्च, जास्त नफा
औषधी आणि सुगंधी उद्योगांमध्ये मोठी मागणी
जलद उत्पादन आणि दोन वेळा कापणीची संधी
उन्हाळ्यात जास्त विक्री आणि अधिक फायदा
शेतकऱ्यांसाठी पुदिना शेती हा मोठा संधीचा मार्ग ठरू शकतो. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास यातून लाखोंचा नफा कमावता येईल!
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Mint farming : उन्हाचा तडाखा वाढला! 'या' पिकाला होतेय देशभरातून मागणी, लागवड केल्यास व्हाल लखपती
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement