Turmeric Seeds : हळदीचे बेणे खरेदी करताना फसवणुकीची शक्यता, अशी करा निवड, कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

यंदा हळदीला बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने बियाणाची किंमत वाढली आहे. हळद बियाणाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून सांगितली जाते.अशा स्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते.

+
हळद

हळद बेणे

सांगली : यंदा हळदीला बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने बियाणाची किंमत वाढली आहे. हळद बियाणाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून सांगितली जाते. अशा स्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते. फसवणूक टाळून बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना हळद बेणे निवडीबद्दल हळद संशोधक प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी केलेले मार्गदर्शन जाणून घेऊ.
सांगलीच्या कसबे डिग्रज येथील हळद संशोधन केंद्रातील कृषी सहाय्यक डाॅ. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणाऱ्या हळदीच्या जातीची निवड करावी. कुरकुमा लौगा या वाणासह राजापूरी ,कृष्णा, सेलम, एकुरपेठा हे उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारे आणि हळद संशोधन  केंद्राने शिफारस केलेले वाण आहेत. शक्यतो संशोधन केंद्राने शिफारस केलेले हळदिचे बियाणे वापरावे.
advertisement
प्रति हेक्टरी लागवडीसाठी हळदीचे 2250 ते 2500 किलो गड्डे म्हणजेच प्रति हेक्टरी 22 ते 25 क्विंटल बेणे वापरणे आवश्यक आहे. लागवडीकरिता जेठे गोल गड्डे वापरावेत. जेठे गोल गड्डे नसल्यास साधारणपणे 40 ते 45 ग्रॅम वजनाचे अंगठे गड्डे वापरावेत. तीस ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे गड्डे लागवडीसाठी निवडू नयेत. लागवडीसाठी निरोगी बेण्यांची निवड करावी.
advertisement
असे बेणे टाळा
कुजलेले, अर्धवट सडलेले बेणे लागवडीसाठी वापरू नये.
परराज्यातून  टिश्यूकल्चर द्वारे तयार केलेली रोपे शक्यतो टाळावीत.
हळद लागवडीसाठी जेठा गड्डे, बगल गड्डे आणि हळकुंडे बेणे म्हणून वापरली जातात. बेणे निवडतांना खालील काळजी घ्यावी.
1. जेठा गड्डा: मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास गड्डा अथवा मातृकंद असे संबोधतात. प्रामुख्याने लागवडीसाठी बेणे हे मातृकंदाचेच ठेवावे. सशाक्त, निरोगी, जाड मातृकंद गड्डे बेणे म्हणून निवडावेत. बेण्यासाठी निवडलेल्या मातृकंदाचे वजन 50 ग्रेम पेक्षा जास्त असावे.आकाराने त्रिकोणाकृती असावे.
advertisement
2. हळकुंडे: बगल गड्ड्याला आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. हळकुंडेदेखील बियाण्यासाठी वापरली जातात.बेणेसाठी निवडलेल्या हळकुंडांचे वजन 20 ग्रॅम पेक्षा जास्त असावे. जर मातृकंद कमी पडत असतील, तर हळकुंडे बेणे म्हणून वापरावेत.निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची भेसळ मुक्त असावीत.
3. बगल गडे: जेठे गड्ड्याला आलेले फुटवे म्हणजे बगल गडे. 40 ग्रेम पेक्षा जास्त वजनाचे बेण्यासाठी निवड करावी. महत्वाचे हळद लागवडीसाठी हळकुंडे वं बगलगड्डे वापरण्यापेक्षा जेठे गड्डे वापरावे त्यामुळे उत्पादन 25 ते 30 टक्क्यांनी वाढते.
मराठी बातम्या/कृषी/
Turmeric Seeds : हळदीचे बेणे खरेदी करताना फसवणुकीची शक्यता, अशी करा निवड, कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement