Ration Card eKYC : रेशनकार्डचे eKYC करायचं आहे का? घरबसल्या मोबईलद्वारे 5 मिनिटांत प्रक्रिया पूर्ण करा, वाचा सविस्तर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ration card update : शासनाकडून गरीब आणि गरजू कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य पुरवठा केला जातो. मात्र, या योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी सरकारने आता e-KYC सक्तीचे केले आहे. जर तुमचे e-KYC अद्याप पूर्ण झाले नसेल, तर त्वरित प्रक्रिया पूर्ण करा. अन्यथा, शिधापत्रिकेवरील लाभ मिळण्यास अडथळा येऊ शकतो.
मुंबई: शासनाकडून गरीब आणि गरजू कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य पुरवठा केला जातो. मात्र, या योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी सरकारने आता e-KYC सक्तीचे केले आहे. जर तुमचे e-KYC अद्याप पूर्ण झाले नसेल, तर त्वरित प्रक्रिया पूर्ण करा. अन्यथा, शिधापत्रिकेवरील लाभ मिळण्यास अडथळा येऊ शकतो.
e-KYC करण्याची सोपी पद्धत
रेशन दुकानात जाऊन e-KYC करण्याची गरज नाही. आता EKYC App च्या मदतीने लाभार्थी स्वतःच,तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांचे e-KYC सहज करू शकतात.
e-KYC प्रक्रियेची मुख्य वैशिष्ट्य
घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण करा
फेस ऑथेंटिकेशनद्वारे झटपट पडताळणी
रास्त भाव दुकानातील दुकानदार किंवा लाभार्थी स्वतः e-KYC करू शकतो
आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक
advertisement
e-KYC प्रक्रिया कशी करावी?
सर्वप्रथम प्ले स्टोअरवरुन मेरा eKYC अॅप डाउनलोड करा. नंतर त्यात लॉग इन करून पर्यायामध्ये महाराष्ट्र राज्य निवडा त्यानंतर आधार क्रमांक टाका आणि OTP प्रविष्ट करा.आणि कॅप्चा कोड भरा नंतर समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा.स्क्रीनवरील सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा. तसेच दुसऱ्या व्यक्तीचे e-KYC करताना बॅक कॅमेरा वापरा
advertisement
पुढे जाऊन यशस्वी पडताळणी झाल्यावर माहिती रास्त भाव दुकानाच्या e-POS मशीनवर दिसेल.अॅपमध्ये "E-KYC Status" तपासा "E-KYC Status - Y" दिसत असल्यास प्रक्रिया पूर्ण झाली असं समजा..
eKYC साठी मुदतवाढ
सरकारकडून रेशन कार्ड eKYC करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. त्यामुळे ज्या लोकांनी अद्याप eKYC केले नसेल त्यांनी हे काम पूर्ण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2025 11:03 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Ration Card eKYC : रेशनकार्डचे eKYC करायचं आहे का? घरबसल्या मोबईलद्वारे 5 मिनिटांत प्रक्रिया पूर्ण करा, वाचा सविस्तर







