खते, घरातला किराणा ते पेट्रोल 230 रु लीटर होणार, इराण-इस्रायल युद्धाचा तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? वाचा

Last Updated:

Iran vs Israel : इस्रायल व इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्व क्षेत्र ढवळून निघालं असून, याचा प्रत्यक्ष परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर आणि जगभरातील महागाईवर दिसू लागला आहे. ताज्या घडामोडीनुसार, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 11% वाढ झाली असून, ते 75.32 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.

agriculture news
agriculture news
मुंबई : इस्रायल व इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्व क्षेत्र ढवळून निघालं असून, याचा प्रत्यक्ष परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर आणि जगभरातील महागाईवर दिसू लागला आहे. ताज्या घडामोडीनुसार, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 11% वाढ झाली असून, ते 75.32 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. ही केवळ सुरुवात असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
कच्च्या तेलाच्या दरवाढीचा धोका वाढतोय
इराकचे परराष्ट्रमंत्री फुआद हुसैन यांनी इशारा दिला आहे की, जर युद्धाचा भडका अधिक वाढला, तर कच्च्या तेलाचे दर 200 ते 300 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचू शकतात. याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल 200 ते 230 रुपये प्रति लिटर या किमतींवर होईल. यामुळे देशातील मूलभूत वस्तूंपासून ते अन्नधान्यापर्यंत सर्वकाही महाग होण्याची शक्यता आहे.
advertisement
भारतासाठी होर्मुज खाडीचे महत्त्व
भारताच्या दृष्टीने होर्मुजची खाडी हा एक अत्यंत महत्त्वाचा आयात मार्ग आहे. भारतात दोन तृतीयांशपेक्षा अधिक कच्चे तेल आणि अर्ध्याहून अधिक एलएनजी गॅस या मार्गातून येतो. जर इराणने हा मार्ग अडवला, तर तेल पुरवठ्याच्या साखळीवर गंभीर परिणाम होईल.
या वस्तूंवर महागाईचा थेट परिणाम होणार
तेल दरवाढ आणि पुरवठा अडथळ्यांमुळे खालील वस्तू मोठ्या प्रमाणावर महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
दैनंदिन वापराच्या वस्तू: साबण, सर्फ, बिस्किटे, पेये, रंग
अन्नपदार्थ: खाद्यतेल, काजू, फळे
इलेक्ट्रॉनिक वस्तू: मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही
औद्योगिक घटक: प्लास्टिक, रसायने, सॉल्ट्स, यंत्रसामग्री, पोलाद व दागिने
शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका
कच्च्या तेलाचे दर वाढल्याने खते, डिझेल आणि पिकांसाठी लागणाऱ्या इतर इनपुट्सच्या किमतीही झपाट्याने वाढणार आहेत. यामुळे पिकाचा उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागेल. परिणामी अन्नधान्याचे दर वाढून सर्वसामान्य ग्राहकावर महागाईचा तडाखा बसेल.
advertisement
वाहतूक आणि किराणा महागणार
वाहतुकीचे दर वाढल्यामुळे किराणा व वस्तूंचा अंतिम विक्री दरही वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा घरखर्च बिघडू शकतो. याशिवाय मंदावलेल्या आयात-निर्यातीमुळे इलेक्ट्रॉनिक्स, उपकरणे, गॅझेट्स महागड्या होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, इस्रायल-इराण संघर्षाचा आर्थिक तणाव जगभर जाणवू लागला असून, भारतात पेट्रोलसह अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सरकारने वेळेत पावले उचलली नाहीत, तर ही महागाई सामान्यांच्या खिशाला जबरदस्त फटका देऊ शकते. शेवटी, जागतिक संघर्षाचा परिणाम घराघरात भाजीच्या दरांपासून पेट्रोलच्या पंपापर्यंत जाणवेल, याची शक्यता नाकारता येणार नाही.
मराठी बातम्या/कृषी/
खते, घरातला किराणा ते पेट्रोल 230 रु लीटर होणार, इराण-इस्रायल युद्धाचा तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? वाचा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement