ट्रॅक्टरपासून ते मळणीयत्रांपर्यंत! खरेदीसाठी सरकार देतंय पैसे, अर्ज कसा अन् कुठे कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती सुलभ आणि फायदेशीर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना" राबवली आहे.
मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती सुलभ आणि फायदेशीर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना" राबवली आहे. ही योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी अनुदान देते. याचा उद्देश म्हणजे शेतीतील कामे वेळेवर, कमी श्रमात आणि कमी खर्चात पूर्ण करून उत्पादनात वाढ करणे.
अलीकडच्या काळात मशागत, पेरणी, कापणी, पीक संरक्षण आणि काढणीपश्चात प्रक्रिया यांसाठी विविध यंत्रांचा वापर वाढला आहे. मात्र अनेक लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे ही यंत्रे खरेदी करता येत नाहीत. यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
कोणत्या यंत्रांसाठी मिळणार अनुदान?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरवर चालणारी अवजारे, पीक फवारणी उपकरणे, कापणीनंतरची प्रक्रिया करणारी यंत्रे आणि इतर कृषी यंत्रांसाठी 40% ते 50% पर्यंत अनुदान दिले जाते.
advertisement
अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी हे अनुदान टप्प्याटप्प्याने असे असेल
ट्रॅक्टर – 1.25 रु लाखांपर्यंत
पॉवर टिलर – 40 ते 50%
स्वयंचलित यंत्रे व अवजारे – 40 ते 50%
काढणी यंत्रे – 50 ते 60%
पीक संरक्षण यंत्रे – 40 ते 50%
कृषी अवजार बँक व सेवा केंद्र
या योजनेच्या माध्यमातून कृषी अवजार बँक किंवा सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यास देखील अनुदान दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना महागडी यंत्रसामग्री भाड्याने वापरता येणार असून, मोठ्या गुंतवणुकीची गरज भासणार नाही.
advertisement
योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम काय आहेत?
एका वेळी फक्त एकाच यंत्रासाठी अनुदान मिळू शकते.पूर्वी जर एखाद्या यंत्रासाठी अनुदान घेतले असेल, तर त्या यंत्रासाठी पुढील 10 वर्षे पुन्हा अर्ज करता येणार नाही. कुटुंबातील कोणाच्या नावावर ट्रॅक्टर असल्यास, त्या ट्रॅक्टरवर चालणाऱ्या अवजारांसाठीही अनुदान मिळू शकते.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड
सातबारा व 8 अ उतारा
advertisement
खरेदी करावयाच्या यंत्राचे कोटेशन
शासकीय तपासणी संस्थेचा अहवाल
पूर्वसंमतीपत्र
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
स्वयंघोषणापत्र
अर्ज कसा करायचा?
कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 'शेतकरी योजना' या विभागाखाली ऑनलाइन अर्ज करावा लागतो. हा अर्ज तुम्ही स्वतः भरू शकता किंवा जवळच्या सीएससी सेंटरमध्ये करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 31, 2025 3:34 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
ट्रॅक्टरपासून ते मळणीयत्रांपर्यंत! खरेदीसाठी सरकार देतंय पैसे, अर्ज कसा अन् कुठे कराल?








